शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

खर्च ७५० कोटी, पदके फक्त दोन!

By admin | Published: August 24, 2016 4:21 AM

‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’ योजनेत तब्बल १०९ खेळाडूंना दोन वर्षे प्रशिक्षण देण्यात आले.

किशोर बागडे,

नागपूर-आॅलिम्पिक पदकांचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून तयार झालेल्या क्रीडा योजना भारतात फसव्या ठरतात याचे उत्तम उदाहरण पहा! ‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’ योजनेत तब्बल १०९ खेळाडूंना दोन वर्षे प्रशिक्षण देण्यात आले. पण निकाल शून्य. लंडन आॅलिम्पिकमध्ये मिळालेल्या सहा पदकाने उत्साहित झालेल्या शासनाच्या क्रीडा खात्याने गेल्या चार वर्षांत तब्बल ७५० कोटी रु.खेळांच्या विविध योजनांवर खर्च केले. पण रिओ आॅलिम्पिकमध्ये पदकांच्या संख्येत भर पडण्याऐवजी ती कमी होऊन दोनच पदके पदरी पडली.राष्ट्रीय क्रीडा महासंघांना देण्यात येणारे अनुदान, साईसारख्या प्रशिक्षण संस्था, कोचेस आणि अन्य पायाभूत सुविधांवर हा खर्च झाला. रिओच्या तयारीसाठी खेळाडूंवर सरकारने ६० कोटी खर्च केल्याची सरकार दरबारी नोंद आहे. तरीही एक बाब मनाला खटकते ती ही की क्रीडा खात्याचे बजेट भारतात फारच अत्यल्प आहे. आॅलिम्पिक वर्षांतही ते वाढविले जात नाही.बीजिंग आॅलिम्पिकचा सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याचे याबाबतचे अलिकडचे वक्तव्य बोलके आहे. तो म्हणतो,‘ ब्रिटनने रिओ आॅलिम्पिकची तयारी डोळ्यापुढे ठेवून आपल्या खेळाडूंवर वारेमाप खर्च केला. पण त्यांचा भर हाच होता की झालेल्या खर्चाचे रुपांतर खेळाडूंनी पदकात करायला हवे. ब्रिटनने जसा पैसा खर्च केला तशी रिओमध्ये ६७ पदकेही जिंकली. पण खेळाडूंवर गुंतवणूक करणे आणि योजना राबविणाऱ्या यंत्रणेवर अंकुश ठेवणे भारतासारख्या देशाला का जमले नाही, हे देखील कोडे आहे.’भारताने ब्रिटनच्या तुलनेत खर्च केलेली रक्कम कमी असेलही पण त्या तुलनेत पदकांची संख्या मात्र वाढली नाही. देशात ब्रिटनच्या तुलनेत १८ ते ३५ वयोगटातील लोकसंख्या कैकपटीने जास्त आहे. पण आॅलिम्पिककडे वळणारे खेळाडू व त्यांच्यावरील खर्च याचा ताळमेळ बसत नाही. भारतात क्रिकेटचा बोलबाला आहे. अन्य खेळांकडे गेल्या दहा वर्षांत थोडे लक्ष गेले आहे. खेळाडूंना सातत्यपूर्ण सराव आणि राजाश्रय दिला जात नाही, ही मुख्य अडचण आहे. बजेटमध्ये सर्वांत कमी पैसा खेळासाठी दिला जातो. भारतात खेळ हा तुलनात्मकदृट्या ‘नॉन प्रॉफिटेबल बिझनेस’ समजला जातो. राष्ट्रीय क्रीडा विकास निधी आणि टार्गेट आॅलिम्पिक पोडियम या दोन्ही योजनांसाठी गतवर्षी केवळ ५० कोटी ठेवण्यात आले, यावरून भारतीय क्रीडा विश्व जगाच्या तुलनेत कुठे आहे, याचा अंदाज येईल. अन्न, वस्त्र, निवारा या मुख्य गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे तशी ‘खेळाद्वारे स्वस्थ जीवन’ हे समजावून सांगण्याची जबाबदारीही सरकारचीच आहे, ही संकल्पना देशात रुजली नसल्याने आॅलिम्पिक खेळ मागे पडत आहेत.काही खेळाडू आणि संघटना स्वबळावर पुढे येण्यासाठी धडपड करतात, पण त्यांनाही मर्यादा आहेत. कार्पोरेट क्षेत्र क्रीडाक्षेत्राला दत्तक घेईल, यादृष्टीने प्रयत्न झाले तर टोकियो आॅलिम्पिकसाठी पोषक वातावरण तयार होण्याची आशा करता येईल. ...तरच टोकियो आॅलिम्पिकमध्ये यश मिळेलभारतीय आॅलिम्पिक संघटनेला आर्थिक बळ देण्याचे काम देशात काही कार्पोरेट घराण्यांनी हातात घेतले आहे. पण त्यात आणखी भर पडायला हवी. महिला मल्ल साक्षी मलिकला जेएसडब्ल्यू स्पोर्टस्ने मदतीचा हात दिला हे सत्य आहे. अन्य खेळाडूंचे हात बळकट होण्याची गरज आहे. १३२ कोटीं लोकसंख्येचा भारत ‘स्पोर्टिंग नेशन’ होण्यासाठी खेळाडूंचा सन्मान व त्यांना अधिकाधिक सोयीसुविधा द्याव्या लागतील, तरच २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदकाच्या रूपात चांगली फळे चाखायला मिळतील.