शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीमुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रक्रियेला उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 03:31 IST

यावेळी महामारीच्या पार्श्वभूमीवर अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही. या महामारीमुळे जगभरात २ लाखांपेक्षा अधिक आणि भारतात ८०० पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीमुळे देशात लॉकडाऊन असल्यामुळे यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची निवड प्रक्रियेला उशीर होत आहे. क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील महिन्यात पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येईल.मंत्रालयातर्फे तसे एप्रिल महिन्यात नामांकन मागविण्यात येते तर पुरस्कार प्रदान समारंभ २९ आॅगस्ट रोजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाºया राष्ट्रीय क्रीडा दिनी होत असतो. पण, यावेळी महामारीच्या पार्श्वभूमीवर अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही.या महामारीमुळे जगभरात २ लाखांपेक्षा अधिक आणि भारतात ८०० पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाºयाने म्हटले की,‘सध्याची स्थिती बघता मंत्रालयाने अद्याप राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार अर्जासाठी परिपत्रक जाहीर केलेले नाही. नेहमी ही प्रक्रिया एप्रिल महिन्यात पूर्ण होते, पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. तरी परिपत्रक मेमध्ये जाहीर होईल, अशी आशा आहे.’कोविड-१९ मुळे केवळ भारतातच नव्हे जर जगभरात क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. अधिकारी पुढे म्हणाले,‘गेल्या महिनाभरापासून देशात सरकारी व राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या कार्यालयातील कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. त्यामुळे उशिर होत आहे.’राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये राजीव गांधी खेल रत्न, अर्जून, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती हे पुरस्कार प्रदान करतात. (वृत्तसंस्था)