शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे बिगुल आज वाजणार, सिंधू असणार ध्वजवाहक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 06:00 IST

२१३ भारतीय रिंगणात : २८० सुवर्ण पदकांसाठी ११ दिवस रंगणार चुरस

बर्मिंगहॅम : २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला गुरुवारी शानदार सोहळ्याद्वारे सुरुवात होईल. यासाठी भारताच्या २१३ जणांच्या पथकासह  ७२ हून अधिक देश सहभागी होत आहेत. पाच हजारांहून अधिक खेळाडू तब्बल ११ दिवस १९ क्रीडा प्रकारात २८० सुवर्ण पदकांसाठी एमेकांशी भिडतील. भारताकडून पी. व्ही. सिंधू, मनिका बत्रा यांच्यासह अनेक स्टार्स मैदानावर आपली ताकद आजमावतील. 

यंदाच्या स्पर्धेत पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंना अधिक सुवर्णपदके दिली जातील. महिला गटात १३६, तर पुरुष गटात १३४ सुवर्ण वितरित केले जातील. मिश्र प्रकारात दहा सुवर्णपदके असतील. यंदाचे आकर्षण महिला क्रिकेट असेल. विश्वविजेते ऑस्ट्रेलिया सुवर्ण पदकासाठी प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघही सुवर्ण पदकाच्या शर्यतीत आहे. मागच्या स्पर्धेत भारताने ६६ पदके जिंकली होती. 

नीरज, सायना, मेरीकोमसह ‘हे’ दावेदार मुकणार 

सुवर्ण पदकाचा दावेदार भालाफेकपटू नीरज चोप्रा, विश्वविजेती बॉक्सर मेरीकोम, ‘फुलराणी’ सायना नेहवाल यांच्यासह अनेक स्टार यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत दिसणार नाहीत.  अनुभवी मेरीकोम गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे. मागच्यावेळी ती चॅम्पियन होती. सायनाने राष्ट्रकुलची चाचणी दिली नव्हती. ती २३ व्या स्थानी आहे. १५ च्या वर रॅंकिंग खेळाडूंना चाचणी देणे अनिवार्य आहे. महिला हॉकीतील स्टार राणी रामपाल पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने संघात नाही. गोळाफेकपटू तेजिंदर तूर पाठदुखीमुळे त्रस्त आहे. थॉमस चषक बॅडमिंटनचे ऐतिहासिक जेतेपद मिळवून देणारा एच. एस. प्रणॉय याची भारतीय संघात निवड झाली नाही.

सिंधू बनणार ध्वजवाहकस्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही राष्ट्रकुल स्पर्धा उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाची ध्वजवाहक असेल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने बुधवारी सिंधूची घोषणा केली. उद्घाटन सोहळ्यात भारताचे १६४ खेळाडू सहभागी होतील. २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेतही सिंधू ध्वजवाहक होती. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा याची याआधी ध्वजवाहक म्हणून निवड झाली होती. मात्र, मांडीच्या दुखापतीमुळे त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर सिंधूकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूCommonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा