शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

Commonwealth Games 2022 : भारताच्या गुरदीप सिंगने पाकिस्तानच्या खेळाडूला दिली टफ फाईट, ३९० किलो वजन उचलून जिंकले कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 12:53 AM

Commonwealth Games 2022 Weightlifting : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या दोन वेटलिफ्टिंगपटूंनी आज दोन पदकांची कमाई केली.

Commonwealth Games 2022 Weightlifting : भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने ( Lovepreet Singh) १०९ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. त्याने एकूण ३५५ किलो ( १६३ + १९२ ) वजन उचलून कांस्यपदक नावावर केले. लवप्रीतने या कामगिरीसह क्लिन अँड जर्कमध्ये राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. त्याच्यानंतर मध्यरात्री झालेल्या १०९+ किलो  वजनी गटात गुरदीप सिंगने कमाल केली. त्याने कडवी टक्कर देताना स्पर्धा विक्रम नावावर केले, परंतु पाकिस्तान व न्यूझीलंडचे खेळाडू वरचढ ठरले. 

दरम्यान महिलांच्या ८७ किलो वजनी गटात पूर्णिमा पांडेला पदक पटकावता आले नाही. स्नॅच प्रकारात पूर्णिमाने १०३ किलोचा सर्वोत्तम भार उचलला. क्लिन अँड जर्कमध्ये तिने १२५ किलो भार उचलून एकूण २२८ किलो वजन उचलले. पण, पदकासाठी हा प्रयत्न अपूरा ठरला. तिला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.  

१०९+ गटात गुरदीपने स्नॅच प्रकारात १६७ किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये १७३ किलोसह स्पर्धा विक्रम नोंदवणाऱ्या पाकिस्तानच्या मुहम्मद नूह दस्तगिरकडून त्याला कडवी टक्कर मिळाली. गुरदीपचा १७३ किलोचा प्रयत्न अयशस्वी ठरला.  क्लिन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नात २०७ किलो वजन उचलून तो आघाडीवर घेतली. पण, २१५ किलो उचलण्याचा दुसरा प्रयत्न फसला. त्यामुळे पदक शर्यतीत कायम राहण्यासाठी त्याने तिसऱ्या प्रयत्नाचा भार २२० किलो इतका केला. सामोआच्या पेटेलो तुएलोमा लाउतूसीचा २१५ किलोचा प्रयत्न फसल्याने त्याला ३७१ किलोसह चौथ्या क्रमांकावर रहावे लागले.

न्यूझीलंडच्या डेव्हीड अँड्य्रूने २१८ किलो भार उचलून नवा स्पर्धा विक्रम नोंदवला, त्याने एकूण ३८८ किलो वजन उचलण्याचा स्पर्धा विक्रमही नावावर केला. त्यामुळे गुरदीपने पुन्हा वजन २२३ किलो इतके वाढवले आणि त्याने ते यशस्वी पेललेही. त्याने २२३ चा स्पर्धा विक्रम व एकूण ३९० चा स्पर्धा विक्रम एका झटक्यात नावावर केला. आता त्याच्या आणि सुवर्णपदकामध्ये अँड्य्रू व पाकिस्तानचा दस्तगिर होता. अँड्य्रूने २२४ किलोचा भार उचलताना पुन्हा दोन्ही स्पर्धा विक्रम नावावर केले. पाकिस्तानच्या दस्तगिरने पहिल्याच प्रयत्नात २२५ किलो भार उचलून एकूण ३९८ किलोसह स्पर्धा विक्रम नावावर केला अन् सुवर्णपदकही. भारताच्या गुरदीपला ३९० किलोसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाWeightliftingवेटलिफ्टिंगIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान