शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Commonwealth Games 2022 : भारताचे नववे पदक! वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरने जिंकून दिले आणखी एक कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 01:16 IST

Commonwealth Games 2022 Weightlifting Harjinder Kaur : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स पदकांची लयलूट करत आहेत.

Commonwealth Games 2022 Weightlifting Harjinder Kaur : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स पदकांची लयलूट करत आहेत.  सोमवारी ज्युदोच्या दोन पदकांची भर पडली.  २७ वर्षीय सुशीला देवी लिकमाबामने ४८ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्यपदक जिंकले, तर विजय कुमारने कांस्यपदकाची कमाई केली. भारताच्या बॅडमिंटनपटूंनीही मिश्र सांघिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना एक पदक निश्चित केले. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ७१ किलो वजनी गटात हरजिंदर कौरने कांस्यपदक जिंकल्याने भारताची पदकसंख्या ९ झाली आहे.  #Weightlifting महिलांच्या ७१ किलो वजनी गटात भारताच्या हरजिंदर कौरला स्नॅच प्रकारात पहिल्या प्रयत्नात ९० किलो भार उचलता आला नाही, परंतु तिने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. प्रतिस्पर्धींचे आव्हान लक्षात घेत तिने तिसऱ्या प्रयत्नात सुरुवातीच्या ९१ किलो लक्ष्यात दोन किलोंची वाढ केली आणि ९३ किलोचे वजन सहज उचलले. पण, इंग्लंडच्या साराह डेव्हिसने १०३ किलोसह स्पर्धा विक्रम व राष्ट्रकुल विक्रम नोंदवला, त्यापाठोपाठ नायजेरियाच्या जॉय ऑगबोनेने १०० किलो वजय उचलले. स्नॅचमध्ये हरजिंदर चौथ्या क्रमांकावर राहिली.

क्लिन अँड जर्कमध्ये हरजिंदरने ११३, ११६ व ११९ किलो असे भार उचलून एकूण २१२ किलोंसह दुसरे स्थान पटकावले होते. कॅनडाची अॅलेक्सी अॅशवर्थ ( ९१ + १२३ किलो) एकूण २१४ किलोसह अव्वल स्थानावर होती. नायजेरियाच्या जॉय ऑगबोनेचा शेवटचा ११४ किलोचा प्रयत्न फसल्याने हे भारतीय स्पर्धक पदकाच्या शर्यतीत कायम राहिली. इंग्लंडच्या साराहने पहिल्याच प्रयत्नात १२६ किलो भार उचलून स्पर्धा विक्रम नोंदवला. तिने एकूण २२९ किलो उचल करून स्पर्धा विक्रम नोंदवताना सुवर्णपदक नावावर केले. 

  • #Judo २०१४च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या सुशीलासमोर अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या मिचेला व्हाईटबू हिचे आव्हान होते. आफ्रिकन खेळाडू वरचढ ठरली आणि भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विजय कुमार यादव ( ६० किलो)ने  ६० किलो वजनी गटाच्या लढतीत सायप्रसच्या पेट्रोसवर विजय मिळवून कांस्य निश्चित केले. 
  • #Boxing भारताचा बॉक्सर अमित पांघल याने ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने नामरी बेरीरवर ५-० असा विजय मिळवला. आता तो पदकापासून एक विजय दूर आहे.   
  • #Squash जोश्ना चिनप्पाचा महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव. क‌ॅनडाच्या हॉली नॉघटनचा ११-९, ११-५ व १५-१३ असा विजय 
  • #Hockey भारतीय पुरुष हॉकी संघाने ४-१ अशी आघाडी असूनही इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ४-४ अशा बरोबरीवर समाधान मानले. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंचा खेळ सुमार झाला
  • #Squash सौरव घोषालने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या ग्रेग लोबानचा ११-५, ८-११, ११-७, ११-३ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक दिली.  
टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाWeightliftingवेटलिफ्टिंग