शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

Commonwealth Games 2022 : भारताचा 'विकास' झाला! सलग तिसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले पदक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 20:32 IST

Commonwealth Games 2022 Weightlifting : वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले. विकास ठाकूरने ९६ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले

Commonwealth Games 2022 Weightlifting : भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी लॉन बॉल ( Lawn Bowls) स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. त्यापाठोपाठ टेबल टेनिसमध्ये पुरुष संघाने सुवर्ण कामगिरी केली आणि वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एक पदक भारताला मिळाले. विकास ठाकूरने ( Vikas Thakur) भारतासाठी रौप्यपदक जिंकले. विकास हा राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचा सर्वात अनुभवी वेटलिफ्टर आहे. त्याने २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि २०१८च्या गोल्ड कोस्ट स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे.

#Weightlifting पुरूषांच्या ९६ किलो वजनी गटात विकास ठाकूर भारताला पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याने स्नॅच प्रकारात सुरुवातीला १४९ किलो वजन सहज उचलले. त्यानंतर त्यात ४ किलोंची भर घालताना त्याने १५३ किलो वजनही उचलून दणक्यात सुरुवात केली. तिसऱ्या प्रयत्नात आणखी भार वाढवून त्याने १५५ किलोची उचल केली. पण, त्याच्यासमोर फिजीच्या तानिएला रैनीबोगी व इंग्लंडच्या सिरिल टीचॅट्चे यांचे आव्हान होते. 

रैनीबोगीचा १६० किलो वजन उचलण्याचा तिसरा प्रयत्न फसला अन् त्यालाही स्नॅचमध्ये १५५ किलो या सर्वोत्तम उचलवर समाधान मानावे लागले. पण, सॅमोआच्या डॉन ओपेलॉगने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात १६१ किलो भार उचलून स्पर्धा विक्रमाची नोंद केली. सिरिलचा १६२ किलोचा प्रयत्न अयशस्वी ठरला अन् त्याला १५८ किलो सर्वोत्तम कामगिरीवर समाधान मानावे लागले. भारतीय वेटलिफ्टर विकाससमोर या तिघांचे कडवे आव्हान होते. ओपेलॉग इथेच थांबला नाही तर त्याने पुढील दोन प्रयत्नांत १६६ व १७१ किलोची उचल करून अन्य स्पर्धक व त्याच्या वजनातील अंतर खूप वाढवून ठेवले.

आता क्लिन अँड जर्कमध्ये खरी चुरस रंगणार होती. विकासने पहिल्याच प्रयत्नात १८७ किलो भार उचलून एकूण ३४२ किलो वजनासह आघाडी घेतली होती, परंतु रैनीबोगीने १८८ किलोचा भार उचलून एक किलोच्या फरकाने भारतीय खेळाडूला मागे टाकले. विकासने दुसऱ्या प्रयत्नात १९१ किलो भार उचलला आणि ३४६ किलोसह रौप्यपदक नावावर केले. 

२०१३ पासून त्याने राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदक जिंकली आहेत. तो सात वेळा राष्ट्रीय विजेताही आहे.  

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाWeightliftingवेटलिफ्टिंग