Commonwealth Games 2022 Table Tennis : ४० वर्षीय शरथ कमनने ( Sharath Kamal) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पदकाची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धेतील त्याचे हे एकूण १३ वे पदक ठरले. यंदाच्या स्पर्धेत त्याने मिश्र दुहेरी, पुरुष सांघिक गटाचे सुवर्णपदक आणि पुरुष दुहेरीचे रौप्यपदक जिंकले आहे. आजच्या अंतिम सामन्यात शरथ कमलसमोर इंग्लंडच्या लिएम पिचफोर्डचे आव्हन होते.
शरथला पहिला गेम ११-१३ असा गमवावा लागला, परंतु त्याने पुढील दोन गेम ११-७, ११-२ असे जिंकून २-१ अशी आघाडी घेतली. शरथने चौथा गेमही ११-६ असा जिंकला आणि सुवर्णपदकाच्या दिशेने मोठी झेप घेतली. शरथने पाचवा गेम ११-७ असा जिंकून ४-१ अशा फरकाने सुवर्णपदक नावावर केले.
#TableTennis साथियन ज्ञानसेकरने पुरुष एकेरीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉकवर ११-९, ११-३, ११-५, ८-११, ९-११, १०-१२, ११-९ असा विजय मिळवला. ३-० अशी आघाडी असूनही भारतीय खेळाडूला सात गेम खेळावे लागले. इंग्लंडच्या खेळाडूने ३-३ अशी बरोबरी आणल्यानंतर अखेरचा गेम चुरशीचा झाला. पण, यात साथियनने बाजी मारली.