शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

Commonwealth Games 2022 Medal tally : २२ सुवर्ण, १६ रौप्य अन् २३ कांस्य! भारतीय संघाने पटकावले 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान, जाणून घ्या पदकविजेत्यांची पूर्ण लिस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 6:39 PM

Commonwealth Games 2022 Medal tally : पी व्ही सिंधू, लक्ष्य सेन, अचंता शरथ कमल  व सात्विक साईराज/चिराग शेट्टी या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी चार सुवर्णपदक जिंकून दिली.

Commonwealth Games 2022 Medal tally : पी व्ही सिंधू, लक्ष्य सेन, अचंता शरथ कमल  व सात्विक साईराज/चिराग शेट्टी या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी चार सुवर्णपदक जिंकून दिली. पुरुष हॉकी संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पण, भारताने चार सुवर्णपदकाची भर घालून गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली. भारताने एकूण २२ सुवर्ण, १६ रौप्य व २३ कांस्यपदकांची कमाई करून ६१ पदकं नावावर केली आणि २० सुवर्णपदक जिंकणाऱ्या न्यूझीलंडला मागे टाकले. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व कॅनडा हे अव्वल तीन संघ ठरले. भारताने यापूर्वी २०१० दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वाधिक १०१ पदकं जिंकली होती, त्याआधी २००२ मध्ये ६९, २०१४मध्ये ६४ व २०१८ मध्ये ६६ अशी पदकं जिंकली होती. 

भारताचे पदकवीर

सुवर्णपदकमिराबाई चानू ( वेटलिफ्टिंग), जेरेमी लालरीनुंगा ( वेटलिफ्टिंग), अचिंता शेऊली ( वेटलिफ्टिंग), लॉन बॉल महिला सांघिक, पुरूष सांघिक टेबल टेनिस, सुधीर ( पॅरा पॉवरलिफ्टिंग), बजरंग पुनिया ( कुस्ती), साक्षी मलिक ( कुस्ती), दीपक पुनिया ( कुस्ती),  रवी कुमार दहिया ( कुस्ती), विनेश फोगाट ( कुस्ती), नवीन मलिक ( कुस्ती), भाविना पटेल ( पॅरा टेबल टेनिस), नितू घांघास ( बॉक्सिंग), अमित पांघल ( बॉक्सिंग), एलडोस पॉल ( तिहेरी उडी), निखत जरीन ( बॉक्सिंग), मिश्र दुहेरी टेबल टेनिस, पी व्ही सिंधू ( बॅडमिंटन), लक्ष्य सेन ( बॅडमिंटन) , पुरुष दुहेरी ( बॅडमिंटन) , अचंथा शरथ कमल ( टेबल टेनिस)

रौप्यपदक संकेत सरगर ( वेटलिफ्टिंग), बिंद्यारानी देवी ( वेटलिफ्टिंग), शुशिला लिकमबाम ( ज्युदो), विकास ठाकूर ( वेटलिफ्टिंग), मिश्र सांघिक ( बॅडमिंटन), तुलिका मान ( ज्युदो), मुरली श्रीशंकर ( लांब उडी), अंशु मलिक ( कुस्ती), प्रियांका गोस्वामी ( १०००० मीटर चालण्याची शर्यत), अविनाश साबळे ( ३००० मीटर स्टीपलचेस), लॉन बॉल पुरुष सांघिक, मिश्र दुहेरी ( टेबल टेनिस), महिला क्रिकेट, अब्दुल्ला अबूबाकेर ( तिहेरी उडी), सागर अहलावत ( बॉक्सिंग), पुरुष हॉकी संघ

कांस्यपदकगुरुराजा पुजारी ( वेटलिफ्टिंग), विजय कुमार यादव ( ज्युदो), हरजिंदर कौर ( वेटलिफ्टिंग), लवप्रीत सिंग( वेटलिफ्टिंग), सौरव घोषाल ( स्क्वॉश), गुरदीप सिंग ( वेटलिफ्टिंग), तेजस्वीन शंकर ( उंच उडी), दिव्या काकरन ( कुस्ती), मोहित ग्रेवाल ( कुस्ती), जास्मिन ( बॉक्सिंग), पूजा गेहलोट ( कुस्ती), पूजा सिहाग ( कुस्ती), मोहम्मद हुस्सामुद्दीन ( बॉक्सिंग), दीपक नेहरा ( कुस्ती), सोनालबेन पटेल ( पॅरा टेबल टेनिस), रोहित टोकास ( बॉक्सिंग), महिला हॉकी, संदीप कुमार ( १०००० मीटर चालण्याची शर्यत), अन्नू राणी ( भालाफेक), मिश्र दुहेरी ( स्क्वॉश), श्रीकांत किदम्बी ( बॅडमिंटन), महिला दुहेरी ( बॅडमिंटन), साथियन ज्ञानसेकरन ( टेबल टेनिस). 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाBadmintonBadmintonWrestlingकुस्तीWeightliftingवेटलिफ्टिंगboxingबॉक्सिंग