शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2018: वेटलिफ्टर्सची 'भार'दस्त कामगिरी सुरूच; प्रदीप सिंहला रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 09:08 IST

भारताचे स्पर्धेतील तिसरे रौप्यपदक

राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीय वेटलिफ्टर्सची शानदार कामगिरी सुरुच आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवसाला सुरुवात होताच प्रदीप सिंहने रौप्यपदकाची कमाई केली आहे. भारताचे हे या स्पर्धेतील तिसरे रौप्यपदक आहे. प्रदीपने सुवर्णपदक विजेत्या समोआ सनेले माओला कडवी झुंज दिली. मात्र त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

यंदा वेटलिफ्टर्सनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. प्रदीप सिंहने राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवसाला सुरुवात होताच १०५ किलो गटात रौप्यपदकाची कमाई केली. प्रदीप सिंहने अंतिम फेरीत समोआ सनेले माओला जबरदस्त झुंज दिली. २३ वर्षांच्या प्रदीप सिंहने अंतिम फेरीत २११ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला अपयश आले. अन्यथा राष्ट्रकुल स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद झाली असती. प्रदीपला स्नॅचमध्ये सुरुवातीला १४८ किलोंचे वजन उचलण्यात अपयश आले. मात्र त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी ठरला. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने १५२ किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले. यानंतर क्लिन अँड जर्कमध्ये प्रदीपने २०० किलो वजन उचलत सुरेख सुरुवात केली. याआधी प्रदीपने क्लिन अँड जर्कमध्ये १९६ किलो वजन उचलले होते. मात्र प्रदीपने या स्पर्धेत वैयक्तिक कामगिरी उंचावली. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने २०९ किलो वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नात त्याने २११ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये तो अपयशी ठरला आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८