शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2018 : वेटलिफ्टर्सची 'भार'दस्त कामगिरी; विकास ठाकूरला कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 12:40 IST

भारतीय वेटलिफ्टर्सचा गोल्डन पंच

गोल्डकोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. आज सकाळी पूनम यादवने 69 किलो गटात सुवर्णपदकाची कमाई केली. यानंतर आता विकास ठाकूरने कांस्यपदक पटकावले आहे. त्यामुळे भारताची स्पर्धेतील एकूण पदक संख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारताला मिळालेली 6 पैकी 5 सुवर्ण पदके ही वेटलिफ्टर्सनी पटकावली आहेत.वेटलिफ्टिंगच्या 94 किलो वजनी गटात विकास ठाकूरने कांस्य पदक पटकावले. विकासने क्लिन आणि जर्कमध्ये 192 किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले होते. मात्र शेवटच्या दोन प्रयत्नांमध्ये विकासला 200 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरला. त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला. विकासने एकूण 351 किलो वजन (स्नॅचमध्ये 159 किलो आणि क्लिन-जर्कमध्ये 192 किलो) उचलण्याची किमया साधली. याआधी ग्लास्गोमध्ये विकासने 85 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली होती. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. आज (रविवारी) महिलांच्या वेटलिफ्टिंगच्या 69 किलो वजनी गटात  भारताच्या पूनम यादवने सुवर्ण पदकावर नाव कोरले. तिने क्लीन अॅण्ड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात 122 किलो वजन उचलले. त्याआधी दुसऱ्या प्रयत्नात 122 किलो वजन उचलण्यात तिला अपयश आले होते. पूनमने एकूण 222 किलो भार उचलला. या प्रकारात इंग्लंडच्या साराह डेव्हिसला रौप्य तर फिजीच्या अपोलोनिया वैवानी हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.  

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८