शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2018: तेजस्विनी सावंतचा 'रौप्य'वेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 10:59 IST

तेजस्विनी सावंतनं पुन्हा राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची कमाई केली

गोल्ड कोस्ट: भारताच्या तेजस्विनी सावंतनं राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनी सावंतनं ५० मीटर रायफल प्रकारात ६१८.९ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावलं आहे. तेजस्विनीचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं. सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे वेलोसोनं ६२१ गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 

आज तेजस्विनी सावंतनं तिचं राष्ट्रकुल स्पर्धेतलं सहावं पदक पटकावलं. याआधी २००६ साली मेलबर्नमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं १० मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर रायफल (पेअर्स) प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली होती. याशिवाय २०१० साली नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्य, तर ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स आणि ५० मीटर रायफल प्रोन (पेअर्स) प्रकारात कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती. तेजस्विनी सावंतनं गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. तेजस्विनीनं एकाच प्रकारात दोनदा पदक जिंकलं आहे. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. तेजस्विनीनं २०१० मध्ये म्युनिचमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ५० मीटर रायफल प्रोनमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. या स्पर्धेत तेजस्विनीनं जागतिक विक्रमाची बरोबरी केली होती. 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८