शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2018 : श्रेयसी सिंगचा 'सुवर्ण'वेध; डबल ट्रॅपमध्ये सोनेरी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 11:15 IST

अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या इमा कॉक्सचा केला पराभव

गोल्डकोस्ट: राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा पदकांचा धडाका सुरुच आहे. नेमबाज श्रेयसी सिंहने डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आजच्या (बुधवारी) दिवसातील भारताचे हे दुसरे पदक आहे. याआधी नेमबाज ओम मिथरवालने ५० मीटर पिस्तुल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. श्रेयसी सिंहने अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या इमा कॉक्सचा पराभव केला. इमा कॉक्स सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र शूट ऑफमध्ये दोन्हीवेळा अचूक निशाणा साधत श्रेयसीने सुवर्णपदकावर नाव कोरले. तर मोक्याच्या क्षणी इमाचा निशाणा चुकल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. निर्णायक क्षणी खेळ उंचावणारी श्रेयसी राष्ट्रकुल स्पर्धेच्या डबल ट्रॅपमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. २०१४ मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही श्रेयसी सिंह सहभागी झाली होती. मात्र त्यावेळी तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. इंग्लंडच्या शार्लेट केरवूडने श्रेयसीला मागे टाकत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यामुळे श्रेयसीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदाच्या स्पर्धेत श्रेयसीने संपूर्ण अनुभव पणाला लावत मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८