गोल्ड कोस्ट - मनू भाकर आणि हीना सिद्धू यांनी नेमबाजीत भारताला पदकांचे खाते उघडून दिल्यानंतर आता पुरुषांच्या गटातूनही भारता एका पदकाची कमाई झाली आहे. पुरुषांच्या नेमबाजीच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटात रवी कुमार याने कांस्यपदक पटकावत भारताला नेमबाजीतील तिसरे पदक मिळवून दिले. या प्रकारात रवी कुमार एकवेळ रौप्यपदक जिंकेल असे वाटत होते. मात्र अखेरीस त्याला 224.1 गुणासह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या नेमबाजीच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटात दीपक कुमार आणि रवी कुमार भारताचे प्रतिनिधित्व करत होते. पैकी दीपक कुमार सहाव्या क्रमांकावर राहिला. मात्र रविकुमार याने कांस्यपदकावर निशाणा साधला.
Commonwealth Games 2018 : नेमबाजीत रवी कुमारला कांस्यपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 10:36 IST