शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2018: भारतीय महिलांना टेबल टेनिसमध्ये सुवर्ण; अंतिम फेरीत सिंगापूरचा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 18:11 IST

भारताने सिंगापूरचा 3-1 असा पराभव केला

गोल्ड कोस्ट: राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिलांनी टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय महिला संघाने बलाढ्य सिंगापूरला 3-1 असे नमवत टेबल टेनिसमध्ये पहिल्यावहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. सिंगापूरचा संघ विजेतेपदासाठी फेव्हरिट मानला जात होता. मात्र भारतीय महिलांनी जबरदस्त कामगिरी करत सिंगापूरला जोरदार धक्का दिला. 

सिंगापूरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मनिका बत्राने संघर्षपूर्ण विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या तिनवेई फेंगला 11-8, 8-11, 7-11, 11-9 आणि 11-7 असा पराभवाचा धक्का देत मनिकाने भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्या सामन्यात सिंगापूरच्या मेनग्यू यूने भारताच्या मधुरिका पाटकरचा 13-11, 11-2, 11-6 असा सरळ गेम्समध्ये धुव्वा उडवला. त्यामुळे अंतिम फेरीत 1-1 अशी बरोबरी निर्माण झाली. यानंतर दुहेरीत मौमा दास आणि मधुरिका पाटकर यांनी यिहान झोऊ आणि मेनग्यू यू यांचा 11-7, 11-6, 8-11 आणि 11-7 असा पराभव करत भारताला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. यानंतर मनिका बत्राने तिच्या दुसऱ्या सामन्यात यिहान झोऊचा 11-7, 11-4 आणि 11-7 असा पराभव करत संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले. त्यामुळे भारताची स्पर्धेतील सुवर्णपदकांची संख्या 7 वर जाऊन पोहोचली. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 12 पदकांची कमाई केली आहे. 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८