शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Wrestler Pooja Sihag Husband Death : राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या पूजा सिहागच्या पतीचा मृत्यू, संदिग्ध अवस्थेत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 15:14 IST

Wrestler Pooja Sihag Husband Death : बर्मिंगहॅम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीत भारताल कांस्यपदक जिंकून देणाऱ्या पूजा सिहाग हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला

Wrestler Pooja Sihag Husband Death : बर्मिंगहॅम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीत भारताल कांस्यपदक जिंकून देणाऱ्या पूजा सिहाग हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पूजाचे पती अजय नांदल याचा संदिग्ध परिस्थिती मृत्यू झाला. अजय नांदल हेही राष्ट्रीय स्थरावरील कुस्तीपटू होते. अजय नांदलचे मित्र सोनू व रवि यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

अजय नांदल हे रोहतक गावातील गढी बोहर येथे राहणारे होते. काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अजय यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाले हे अद्याप कळलेले नाही. पण, हाती आलेल्या माहितीनुसार एका गाडीत अजय व त्याचे दोन मित्र जाट कॉलेजजवळ काहीतरी पेय पीत असल्याची माहिती मिळाली आहे. 

कुस्तीपटू पूजा सिहागने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२मध्ये ७६ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली आहे. तिने कांस्यपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुएनवर ११-० असा विजय मिळवला होता. मागील वर्षी पूजा व अजय यांचे लग्न झाले होते. अजय हे २०१०पासून कुस्ती शिकत होते. शिवाय ते CISF मध्ये कार्यरत होते. 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने २२ सुवर्ण, १६ रौप्य व २३ कांस्यपदकं जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलिया ६७ सुवर्ण, ५७ रौप्य व ५४ कांस्यपदकासह अव्वल स्थानावर राहिली. यजमान इंग्लंडला ५७ सुवर्णपदकांसह दुसऱ्या व कॅनडाल २६ सुवर्णपदकांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाWrestlingकुस्ती