शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
4
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
5
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
6
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
7
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
8
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
9
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
10
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
11
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
12
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
13
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
14
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
15
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
16
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
17
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
18
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
19
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
20
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल

सीओईपी संघाची विजेतेपदाची हॅटट्रिक

By admin | Updated: February 20, 2017 00:43 IST

तीव्र चढ आणि उतार, पाण्याची तळे, खडकाळ ट्रॅक यातून मार्ग काढत कॉलेज आॅफ इंजिनियरिंग पुणेच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले.

आकाश नेवे / पिथमपूर (इंदूर)तीव्र चढ आणि उतार, पाण्याची तळे, खडकाळ ट्रॅक यातून मार्ग काढत कॉलेज आॅफ इंजिनियरिंग पुणेच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम निकालात पुण्याच्या नवले अभियांत्रिकी, सिंहगड अभियांत्रिकी, आल्हाट महाविद्यालय आणि सीओईपीचाच बोलबाला राहिला. जवळपास प्रत्येक विभागात पुण्याच्या महाविद्यालयांनी विजय मिळवला.एम बाहा तील अंतिम निकालात सर्वोत्तम संघाचे पारितोषिक सीओईपी पुणे, द्वितीय पारितोषिक आल्हाट अभियांत्रिकी पुणे, तिसरे स्थान जालंधरच्या बी. आर. आंबेडकर नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने पटकावले.तर इ बाहात पहिले स्थान पुण्याच्या सिंहगड अभियांत्रिकीने, तर दुसरे स्थान बी. व्ही. कॉलेज आॅफ इन्स्टिट्यूटने पटकावले. या स्पर्धेत एम बाहा या गटात अनेक संघ स्पर्धाच पूर्ण करू शकले नाहीत.महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, एसएई इंडियाने आयोजित केलेल्या बाहा २०१७ या एटीव्ही रेसचा समारोप पिथमपूर येथील नॅटरॅक्स येथे करण्यात आला.सकाळी स्पर्धेचे उद्घाटन महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे एम. डी. पवन गोयंका यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेची सुरुवात १५ रोजी करण्यात आली होती. तांत्रिक चाचण्यांनंतर या स्पर्धेची अंतिम फेरी एड्युरंस टेस्ट घेण्यात आली. या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयाच्या संघाला सलग चार तास आपली एटीव्ही  चालवयाची होती.खडकाळ रस्ता, चिखल, पाणी, तीव्र चढ-उतार याचा सामना करत  या संघांनी आपल्या गाड्या मजबूत असल्याची चाचणी  दिली. त्यातून तांत्रिक बाबींतून सीओईपीच्या संघाला विजेता घोषित करण्यात आले.