शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोच कुंबळेंच्या सेकंड ‘इनिंग्ज’ला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 06:53 IST

भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्याचा प्रारंभ आज, शनिवारपासून विंडीज बोर्ड एकादशविरुद्धच्या दोन दिवसांच्या सामन्याद्वारे करणार आहे. मुख्य कोच अनिल कुंबळे यांच्या नव्या इनिंग्जला

बासेटेरे : भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्याचा प्रारंभ आज, शनिवारपासून विंडीज बोर्ड एकादशविरुद्धच्या दोन दिवसांच्या सामन्याद्वारे करणार आहे. मुख्य कोच अनिल कुंबळे यांच्या नव्या इनिंग्जला ४९ दिवसांच्या दौऱ्याने सुरुवात होत असून, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा फिटनेस, तसेच फलंदाजांचा फॉर्म तपासून पाहण्याचा प्रयत्न ते करणार आहेत.विंडीज बोर्ड एकादश संघात कसोटी संघातील सहा खेळाडूंचा भरणा असून, त्यात लियोन जॉन्सन, जर्मेन ब्लॅकवूड, राजेंद्र चंद्रिका, शेन डारिच, शाय होप तसेच जोमेल वॉरिकन यांचा समावेश असल्याने भारतीय संघाला तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. शमी कसोटी सामन्यात गोलंदाजी करण्यायोग्य आहे किंवा नाही हे पहिल्या सराव सामन्याद्वारे स्पष्ट होईल. कर्णधार विराट कोहली याने शमीचे कौतुक करताना सांगितले की, तो कसोटी सामन्यात आदर्श असा अचूक टप्पा राखून गोलंदाजी करतो.ईशांत शर्मा हादेखील दीर्घकाळानंतर संघात परतला आहे. वेगवान माऱ्यासाठी उमेश यादव हा देखील सज्ज आहे. राखीव गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार तसेच शार्दुल ठाकूर हे आहेत. भारतीय संघ एरवी विदेश दौऱ्यावर असतो, त्यावेळी सराव सामन्यात तज्ज्ञ फलंदाज ७५-८० धावा काढून निवृत्त होतात. सर्वांना फलंदाजीचा सराव मिळावा, हा यामागील हेतू असतो. कसोटी सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेला शिखर धवन याचा फॉर्म तपासून पाहण्याची हिच वेळ असल्याचे कुंबळे यांचे मत आहे. त्याच्यासोबत मुरली विजय डावाला सुरुवात करेल. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर मधल्या फळीत सातत्यपूर्ण फलंदाजीची भिस्त आहे. के. एल. राहुल देखील सराव सामन्यात देखणी कामगिरी करीत धवनपुढे आव्हान उभे करण्यास सज्ज आहे. विंडीजच्या मंद खेळपट्ट्यांवर तीन फिरकीपटूंना संधी मिळू शकते. फिटनेसची समस्या नसेल तर अश्विन संघात असेलच, पण रवींद्र जडेजाच्या तुलनेत अमित मिश्रा याला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. संघ यातून निवडणार...भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, उमेश यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्ष एकादश : लियोन जॉसन (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, राजेंद्र चंद्रिका, रोस्टन चेस, जॉसन डावेस, शेन डारिच, शाय होप, डोमियन जेकब्स, कियोन जोसेफ, मारकिनो मांडले, विशाल सिंग, जोमेन वारिकन.सामन्याची वेळ सायंकाळी ७.३० पासून