ऑनलाइन लोकमत
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल सध्या मायदेशी परतला आहे. त्यामुळे गेल आयपीएलमधील बंगळुरूच्या दोन सामन्यांना मुकणार आहे.
गेलची पत्नी नताशा बॅरिज पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे बाळाच्या स्वागतासाठी गेल जमैकाला रवाना झाला आहे. गेलने आपल्या इंस्टाग्रामवर विमानातील फोटो अपलोड केला आहे, त्याखाली गेलने 'बेबी मी माझ्या वाटेवर आहे', असं लिहिलं आहे.
आयपीएलच्या सामन्यात गेलच्या अनुपस्थितीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला त्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ येत्या २० आणि २२ एप्रिलच्या सामन्यात गेलशिवाय खेळणार आहे. २५ एप्रिलला गेल भारतात परतल्यानंतर पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघात दिसणार आहे.