शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
4
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
5
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
6
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
7
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
8
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
9
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
12
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
13
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
14
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
15
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
16
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
17
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
18
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
19
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
20
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?

ख्रिस गेल हा टी-२० चा ‘बादशहा

By admin | Updated: May 14, 2016 01:49 IST

ख्रिस गेल याचा सन्मान करण्याची ८८०० कारणे आहेत. टी-२० त त्याने इतक्याच धावा केल्या. यात टी-२० तील १७ शतकांचा समावेश आहे हे विशेष. तो नावानेच नव्हे, तर स्वभावानेदेखील या प्रकारात बादशहा आहेच

’एबी डिव्हिलियर्स लिहितो़ -

ख्रिस गेल याचा सन्मान करण्याची ८८०० कारणे आहेत. टी-२० त त्याने इतक्याच धावा केल्या. यात टी-२० तील १७ शतकांचा समावेश आहे हे विशेष. तो नावानेच नव्हे, तर स्वभावानेदेखील या प्रकारात बादशहा आहेच. २०११ मध्ये डर्क नानेस जखमी होताच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुत दाखल झालेला गेल संघाचा सुपरस्टार बनला. आयपीएलच्या सुरुवातीच्या सत्रात तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये होता. त्यावेळी १४१.५९ च्या सरासरीने ४६३ धावा केल्या; पण २०११ च्या लिलावात त्याला कुणी गिऱ्हाईकच मिळाला नाही. त्याचे बेस प्राईज होते चार लाख डॉलर. आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे संपूर्ण स्पर्धेत खेळणे निश्चित नव्हते, असे मला आठवते. त्यानंतर गेल आरसीबीत दाखल झाला. तेव्हापासूनचा इतिहास आपल्यापुढे आहे. सामन्यागणिक आणि षटकागणिक त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात चौकार ठोकला आहे. प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केल्याने टी-२०चा तो निर्विवाद बादशहा बनला. आयपीएलमधील त्याची आकडेवारी बोलकी आहे. २०११ मध्ये त्याने आरसीबीसाठी ६०८ धावा केल्या. २०१२ मध्ये ७३३ आणि २०१३ साली ७०८ धावा केल्या. २०१४ मध्ये गेल केवळ ९६ धावा काढू शकला. २०१५ मध्ये गेलने ४९१ धावांचे संघाला योगदान दिले. या कालावधीत आयपीएल जिंकू न शकल्याचे शल्य माझ्यासह सर्वांना आहेच. पण, चिन्नास्वामीसह अन्य मैदानांवरदेखील आम्ही कडवा प्रतिकार करीत शानदार क्रिकेट खेळलो हे सत्य आहे. प्रत्येक वेळी गेल हाच आकर्षणाचे केंद्र होता. २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्धची त्याची खेळी आयपीएल इतिहासातील सर्वांत मोठी वैयक्तिक खेळी ठरली. या मोसमात अपेक्षेनुसार खेळ तो करू शकला नाही. पण, फॉर्म ‘टेम्पररी’ असतो हे विसरू नका. क्लास मात्र ‘परमनंट’ असतो. गेल नेहमीच सांघिक खेळाडू राहिला. तो नेहमी चांगल्याच मूडमध्ये असतो. संघात नवी ऊर्जा आणण्याचे काम तोच करतो. गेल टी-२० चा बादशाह आहे आणि नेहमीच राहणार. (टीसीएम)