शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

ख्रिस गेल "रिटर्न्स", विराट येणार सलामीला ?

By admin | Updated: July 9, 2017 14:34 IST

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज रविवारी खेळल्या जाणाऱ्या एकमेव टी-२० लढतीसाठी वेस्ट इंडिजने तुफानी ख्रिस गेल याला संघात स्थान दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
किंग्जस्टन, दि. 9 - भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज रविवारी खेळल्या जाणाऱ्या एकमेव टी-२० लढतीसाठी वेस्ट इंडिजने तुफानी ख्रिस गेल याला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे विंडीजच्या संघाची ताकद वाढली असल्याचं मानलं जात असलं तरीही सामन्यात भारताचं पारडं जड राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या सामन्यात कर्णधार विराट कोहली सलामीवीराची भूमिका बजावेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
 
या एकमेव टी-२०साठी भारतीय संघ  भारतीय संघ डावपेच व संघ यात बदल करू शकतो. एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे ही जोडी सलामीला आली. या एकमेव टी-20त विराट कोहली सलामीला येण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून कोहली सलामीला येतो.
 
युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला या दौऱ्यात प्रथमच संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भविष्यातील वन-डे यष्टिरक्षक म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. पाच सामन्यांची वन-डे मालिका ३-१ अशी जिंकणाऱ्या भारताला टी-२० जिंकून मालिकेचा शानदार समारोप करायचा आहे. यासाठी ख्रिस गेलच्या फलंदाजीवर अंकुश लावावा लागेल. खराब फॉर्म आणि जखमांशी झुंज देणारा गेल 15 महिन्यांनंतर राष्ट्रीय संघात परतला. आयपीएलमध्येहीतो अपयशी ठरला होता.
(हार्दिक, केदार संघाचे भविष्य : विराट)
(विराट - कुंबळे वादावर सौरभ गांगुलीचा मोठा खुलासा)
(मी नेहमीच ड्रेसिंग रुममधील पावित्र्य राखलं, विराट कोहलीचा कुंबळेवर निशाणा)
विंडीज संघ या प्रकारात सध्या विश्वविजेता असून संघात गेलसह मार्लोन सॅम्युअल्स, सुनील नारायण, सॅम्युअल बद्रीसारखे मॅचविनर आहेत. टी-२० चा तज्ज्ञ कार्लोस ब्रेथवेट कर्णधार असेल. मागच्या वर्षी फ्लोरिडात भारताविरुद्धच्या टी-२० त ४९ चेंडूंत शतक झळकविणारा एव्हिन लुईस याचादेखील संघात समावेश आहे. या लढतीसाठी भारतीय संघ डावपेच व संघ यात बदल करू शकतो. रोहितच्या अनुपस्थितीत कोहली सलामीला खेळण्याची शक्यता आहे. युवा ऋषभ पंतला दौऱ्यात प्रथमच संधी दिली जाईल. भविष्यातील वन-डे यष्टिरक्षक म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. कुलदीप यादवदेखील संघात असेल. तो वेगवान भुवनेश्वर व उमेश यादवनंतर फिरकीची बाजू सांभाळेल. विंडीजच्या आक्रमणाची भिस्त नारायण व बद्रीवर राहील. नारायण फलंदाजीत सलामीला खेळू शकतो.
उभय संघ असे...
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, युवराजसिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, दिनेश कार्तिक आणि मोहम्मद शमी.
वेस्ट इंडीज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), सॅम्युअल बद्री, रोन्सफोर्ड बीटन, ख्रिस गेल, एव्हिन लुईस, जेसन मोहम्मद, सुनील नारायण, किरॉन पोलार्ड, रोवमॅन पॉवेल, मार्लोन सॅम्युअल्स, जेरोम टेलर, चाडविक वॉल्टन, केसरिक विल्यम्स.
स्थळ : सबीना पार्क, किंग्जस्टन, जमैका
सामन्याची वेळ : रात्री ९ वाजल्यापासून