शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

बुध्दिबळ : कौस्तव चक्रवर्ती ठरला विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 23:29 IST

पहिल्या पटावर झालेल्या लढतीत अजय मुशीणी विरुद्ध खेळतांना कौस्तव चक्रवर्तीने सिसिलियन ग्रँड प्रिक्स बचाव पद्धतीचा अवलंब करून कोणताही धोका पत्करला नाही आणि डाव फक्त २२ चालीमध्ये बरोबरीत सोडवला.

मुंबईमुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व व्हिनस चेस अकादमी आयोजित १२ व्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमधील ब विभागात  १४ व्या मानांकित पश्चिम बंगालचा कौस्तव चक्रवर्तीने (इलो १९०६) साखळी ८.५ गुणांसह अव्वल स्थान पटकाविले. दहावा मानांकित कर्नाटकच्या शरण रावचे (इलो १९३१ ) देखील साखळी८.५ गुणच झाले होते. परंतु टायब्रेकरवर कौस्तव सरस ठरल्याने शरणला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ७२वा मानांकित तामिळनाडूचा के. गोकुलराज (इलो १६४८),  ३५वा मानांकित महाराष्ट्राचा हर्षल पाटील (इलो १८०९ ), द्वितीय मानांकित आंध्र प्रदेशचा  अजय मुशिणी (इलो १९७७) व १०५वा मानांकित तामिळनाडूचा आर. शाम (इलो १५६५) यांचे प्रत्येकी साखळी ८ गुण झाले. परंतु टायब्रेकरनुसार गोकुलराजला तिसरा, हर्षलला चौथा,  अजयला  पाचवा तर शामला सहावा क्रमांक व पुरस्कार मिळाला.

बांद्रा कुर्ला संकुलातील  माऊंट लिटेरा स्कूल इंटरनॅशनल सभागृहात स्पर्धेमधील अग्रमानांकित बुध्दिबळपटूना मागे टाकत कौस्तव चक्रवर्तीआणि के. गोकुलराज यांनी नवव्या साखळी फेरी अखेर सर्वाधिक ८ गुणांसह संयुक्त आघाडी घेतली होती. त्यामुळे विजेतेपदाची दावेदारी सिद्ध करण्यासाठी निर्णायक दहाव्या साखळी फेरीत दोघे अग्रेसर होते. निर्णायक दहाव्या साखळी फेरीत पहिल्या पटावर कौस्तव चक्रवर्ती विरुद्ध खेळतांना मुशींणी अजयने आपला डाव २२ चालीमध्ये बरोबरीत सोडवून गोकुलराजला जेतेपद मिळविण्याची सुवर्णसंधी दिली होती. परंतु दुसऱ्या पटावर शरण रावने गोकुलराजचा धक्कादायक पराभव करून कौस्तवला विजेतेपदाची माळ घातली. 

पहिल्या पटावर झालेल्या लढतीत अजय मुशीणी विरुद्ध खेळतांना कौस्तव चक्रवर्तीने सिसिलियन ग्रँड प्रिक्स बचाव पद्धतीचा अवलंब करून कोणताही धोका पत्करला नाही आणि डाव फक्त २२ चालीमध्ये बरोबरीत सोडवला. दुसऱ्या पटावर पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या गोकुलराजने शरण राव विरुद्ध इंग्लिश ओपनिंग पद्धतीचा अवलंब केला. परंतु सरस इलो रेटिंग गुण असलेल्या शरण समोर गोकुळराजचा टिकाव लागला नाही. शरणने त्याला ३६ चालीत पराभव स्वीकारण्यास भाग पाडले.

टॅग्स :Chessबुद्धीबळMumbaiमुंबईMayorमहापौर