शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
2
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
3
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
4
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
5
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
6
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
7
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
8
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
9
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
10
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
11
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
12
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
13
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
14
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
15
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
16
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
17
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
18
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
19
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
20
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?

‘चेन्नईयन’च्या खेळाडूस अटक

By admin | Updated: December 22, 2015 03:03 IST

चेन्नईयन एफसीने गोव्याचा पराभव करीत आयएसएलचा चषक पटकविला खरा; पण सामन्यानंतर जो ‘सामना’ रंगला ते मात्र धक्कादायक होते.

सचिन कोरडे,  मडगावचेन्नईयन एफसीने गोव्याचा पराभव करीत आयएसएलचा चषक पटकविला खरा; पण सामन्यानंतर जो ‘सामना’ रंगला ते मात्र धक्कादायक होते. एफसी गोवाचे सहमालक दत्तराज साळगावकर यांना मैदानावरच धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून चेन्नईयन एफसीचा खेळाडू इलानो ब्लूमर (ब्राझील) याला रविवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान अटक करण्यात आली. दत्तराज साळगावकर यांनी मडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मडगाव पोलीस ठाणे परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव होता. या घटनेचा निषेध म्हणून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बक्षीस वितरण समारंभास उपस्थित न राहता, आल्या पावली परतणे पसंत केले. एफसी गोवाच्या संपूर्ण संघाने बक्षीस वितरण समारंभावर बहिष्कार टाकला. माहितीनुसार, सामना संपल्यानंतर दत्तराज साळगावकर मैदानात उतरले होते. मैदानावर येताच चेन्नईयन एफसीचा खेळाडू ब्लूमरने त्यांच्याशी हुज्जत घातली. एवढेच नव्हे, तर त्याने साळगावकर यांना धक्काबुक्कीसुद्धा केली. हा सर्व प्रकार मैदानावर उपस्थित असलेले चाहतेसुद्धा बघत होते. हे चित्र पाहून एफसी गोवाचे प्रशिक्षक झिको व इतर पदाधिकारी त्यांच्याजवळ धावून आले. हा प्रकार चेन्नईयन एफसीचा सहमालक अभिषेक बच्चनही बघत होता. अभिषेकनेही मध्यस्थी करीत ब्लूमर याला बाजूला नेले. मात्र, घडलेली घटना गंभीर असल्याने साळगावकर यांनी ब्लूमर याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. स्वीय सहायकांना धक्काबुक्कीसामन्यावेळी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचे स्वीय सहायक शैलेश उगाडेकर यांना पोलिसाकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला. उगाडेकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीप्रमाणे, पत्नी व मुलांसह उगाडेकर हे फुटबॉल सामन्यासाठी जाताना त्यांच्याकडे चिप्स असल्याने त्यांना सुरक्षा रक्षकाने अडवले. तेथील एका पोलिसानेही त्यांना शिवीगाळ केली. उगाडेकर हे सामना संपवून परत येताना पुन्हा एकदा त्या पोलिसाने वाद उकरून काढला. सहायक प्रशिक्षकांच्या अंगावरही धावला...चेन्नईयन एफसीचा खेळाडू ब्लूमर हा सामना संपल्यानंतर एफसी गोवाच्या सहायक प्रशिक्षकांच्या अंगावरही धावून गेला होता. त्या वेळी सहमालक श्रीनिवास धेंपे, एफसी गोवाचे सीईओ सुखविंदर आणि झिको यांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. हा वादही चांगलाच विकोपाला गेला होता. मध्यस्थी करताना अधिकाऱ्यांनी धेंपे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र धेंपेसुद्धा चांगलेच आक्रमक झाले होते. अखेर घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त करीत त्यांनी बक्षीस वितरण समारंभावर बहिष्कार टाकला. एवढेच नव्हे, तर त्यांनी पत्रकार परिषदेसही हजेरी लावली नाही.