शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

चेन्नई ‘एक्स्प्रेस सुपरफास्ट’!

By admin | Updated: April 26, 2015 01:35 IST

महेंद्रसिंह धोनीची नाबाद ४१ धावांची खेळी आणि त्यानंतर जडेजाचे ३ बळी यांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ९७ धावांनी धुव्वा उडवला.

पंजाबवर ९७ धावांनी मात : मॅक्युलमचे अर्धशतक, जडेजाचे ३ बळीचेन्नई : ब्रँडन मॅक्युलमचे झुंझार अर्धशतक (४४ चेंडूंत ६६), कर्णधार महेंद्रसिंह धोनीची नाबाद ४१ धावांची खेळी आणि त्यानंतर जडेजाचे ३ बळी यांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ९७ धावांनी धुव्वा उडवला. १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा डाव २० षटकांत अवघ्या ९५ धावांवर आटोपला. त्यांच्या मुरली विजयने सर्वाधिक ३४ धावा केल्या. इतर फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांपुढे नांगी टाकली. प्रत्युत्तरात, पंजाबची सुरुवात धक्कादायक झाली. त्यांनी आपले पाच फलंदाज अवघ्या ५५ धावांवर गमावले. यामध्ये वीरेंद्र सेहवाग (१), शॉन मार्श (१०), जॉर्ज बेली (१) आणि मिलर (३) आणि मुरली विजय (३४) यांचा समावेश आहे. अर्धा संघ दहाव्या षटकात तंबूत परतल्याने सामन्यात केवळ चेन्नईच्या विजयाची औपचारीकताच बाकी होती. रवींद्र जडेजाने बेली आणि मिलर या दोघांचा अडथळा दूर केला तर पांडेने सेहवागला बाद केले. मध्यमफळीत रिद्धिमान साहाने (१५) प्रयत्न केला. पटेल (९), जॉन्सन (१), अनूरित सिंग (१०) हेसुद्धा झटपट बाद झाले. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३, आशिष नेहरा आणि आर. आश्विनने प्रत्येकी २ तर पांडे आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सलामीवीरांना यशस्वी ठरवला. ड्वेन स्मिथ (२६) आणि ब्रँडन मॅक्युलम (६६) यांनी पहिल्या गड्यासाठी अर्धशतकीय भागीदारी केली. स्मिथ अनुरित सिंगच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याने अवघ्या १३ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २६ धावा ठोकल्या. तो बाद झाल्यानंतर मॅक्युलम आणि सुरेश रैना या जोडीने सूत्रे स्वीकारली. या दोघांनीही पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली.रैनाने २५ चेंडूंत २९ धावा केल्या. त्याने ४ चौकार लगावले. रैनाने मॅक्युलमसोबत दुसऱ्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी केली. पटेलच्या चेंडूवर बेलीने मॅक्युलमचा झेल टिपला. मॅक्युलमने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४४ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर रैनाही परतला. त्यानंतर धोनी आणि जडेजा या जोडीने ४८ धावांची भागीदारी केली. यामध्ये धोनीने २७ चेंडूंत नाबाद ४१ धावांची खेळी केली. त्याने २ चौकार आणि २ षटकार ठोकले. जडेजाने ११ चेंडूंत नाबाद ११ धावा केल्या. चेन्नईला १९२ धावापर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून अनूरित आणि पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला(वृत्तसंस्था)धावफलक : चेन्नई सुपरकिंग्ज : ड्ेवन स्मिथ त्रि. गो. अनुरित सिंग २६ ब्रँडन मॅक्युलम झे.मिलर गो. पटेल ६६ सुरेश रैना धावबाद (करणवीर सिंग) २९, महेंद्र सिंग धोनी नाबाद ४१, रविंद्र जडेजा नाबाद १८; अवांतर : १२; एकूण : ३ बाद १९२; गोलंदाजी : करणवीर सिंग ४-०-०-४३-०, संदीप शर्मा ४-०-३२-०, अनुरित सिंग ४-०-४०-१, मिशेल जॉनसन ४-०-४०-०, अक्षर पटेल ४-०-३५-१ किंग्ज इलेव्हन पंजाब : मुरली विजय झे. ब्राव्हो गो. आश्विन ३४, वीरेंद्र सेहवाग झे. डु प्लेसिस गो. पांडे १, शॉन मार्श पायचीत गो. नेहरा १०, जॉर्ज बेली झे. धोनी गो. जडेजा १, डेव्हिड मिलर झे. रैना गो. जडेजा ३, रिद्धिमान साहा झे. आश्विन गो. नेहरा १५, अक्षर पटेल यष्टीचीत धोनी गो. आश्विन ९, मिशेल जॉन्सन झे. नेहरा गो. जडेजा १, अनुरितसिंग झे. जडेजा गो. शर्मा १०, कर्णवीरसिंग नाबाद २, संदीप शर्मा नाबाद १; अवांतर : ८, एकूण : ९ बाद ९५; गोलंदाजी : ईश्वर पांडे २-०-१७-१, आशिष नेहरा ४-०-१६-२, मोहित शर्मा ३-०-१०-१, रवींद्र जडेजा ४-०-२२-३, आर. आश्विन ४-०-१४-२, ड्वेन ब्राव्हो ३-०-१३-०.