शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

केकेआरपुढे चेन्नईचे आव्हान

By admin | Updated: May 20, 2014 00:42 IST

सलग चार सामन्यांत विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या केकेआर (कोलकाता नाईट रायडर्स) संघाला गृहमैदानावर चेन्नई सुपरकिंग्जच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

कोलकता : सलग चार सामन्यांत विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या केकेआर (कोलकाता नाईट रायडर्स) संघाला गृहमैदानावर चेन्नई सुपरकिंग्जच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीत सरशी साधत प्लेआॅफमध्ये स्थान पक्के करण्यास केकेआर संघ उत्सुक आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये प्रारंभ झालेली ही स्पर्धा आता निर्णायक वळणावर असून, केकेआर संघाला गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळणार आहे. केकेआर संघाची भिस्त फिरकीपटू सुनील नरेनच्या कामगिरीवर अवलंबून आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरलेल्या नरेनने या स्पर्धेत १५ बळी घेतले आहेत. या व्यतिरिक्त आक्रमक फलंदाज रॉबिन उथप्पाला गवसलेला सूर केकेआर संघासाठी जमेची बाजू आहे. उथप्पाने भारतात खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांत ५४.१६ च्या सरासरीने धावा फटकाविल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. उथप्पाने ११ सामन्यांत ४२२ धावा फटकाविल्या असून, त्यात भारतात त्याने ३२५ धावा फटकाविण्याची कामगिरी केली आहे. कर्णधार गौतम गंभीरलाही सूर गवसला आहे. रविवारी हैदराबादविरुद्धच्या विजयात रॅन टेन डोएश्चे व मॅचविनर युसूफ पठाण यांची खेळी केकेआर संघासाठी दिलासा देणारी ठरली आहे. युसूफने २७ चेंडूंमध्ये ३८ धावा फटकाविल्या, तर डोएश्चेने अखेरच्या षटकात षटकार व चौकार ठोकत १० धावा वसूल केल्या. प्लेआॅफच्या चौथ्या स्थानासाठी केकेआर, आरसीबी आणि हैदराबाद संघांदरम्यान चुरस आहे. केकेआर संघाच्या खात्यावर बँगलोरच्या तुलनेत दोन आाणि हैदराबादच्या तुलनेत चार गुण अधिक आहेत. केकेआर संघाला दोनदा विजेतेपद मिळविणार्‍या व आयपीएलमध्ये कामगिरीत सातत्य राखणार्‍या चेन्नई संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआर संघाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. ११ सामन्यांत ८ विजय मिळविणारा चेन्नई संघ गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)