शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चानूचा सुवर्ण पराक्रम, जागतिक भारोत्तोलन, मल्लेश्वरीनंतर २२ वर्षांनी विश्वविक्रमाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:41 IST

भारताची महिला भारोत्तोलक मीराबाई चानूने जागतिक भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजन गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून हा पराक्रम केला.

नवी दिल्ली : भारताची महिला भारोत्तोलक मीराबाई चानूने जागतिक भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजन गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून हा पराक्रम केला. भारोत्तोलन स्पर्धेत पदकाची कमाई करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. २२ वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.यामुळे रिओ आॅलिम्पिकमधील खराब कामगिरीची तिची नाराजीदेखील दूर झाली. राष्टÑगीताची धून वाजताच भारतीय रेल्वेची खेळाडू असलेल्या मीराबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आॅलिम्पिक कांस्य विजेती कर्णम मल्लेश्वरी हिने याआधी १९९४ आणि १९९५ मध्ये विश्व स्पर्धेचे सुवर्ण जिंकले होते. चानू रिओ आॅलिम्पिकच्या तिन्ही प्रयत्नांत अपयशी ठरली होती. १२ खेळाडूंचा समावेश असलेल्या या प्रकारात ज्या दोन खेळाडू स्पर्धा पूर्ण करू शकल्या नव्हत्या, त्यात चानू एक होती. आज थायलंडची सुकराचोन हिला रौप्य आणि सेगुरा इरिसने कांस्य जिंकले. डोपिंग प्रकरणामुळे रशिया, चीन, कझाकस्तान, युक्रेन आणि अझरबैजान येथील भारोत्तोलक या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत.राष्टÑपती, पंतप्रधानांकडून अभिनंदनसुवर्ण विजेती भारोत्तोलक साइखोम मीराबाई चानू हिचे राष्टÑपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.‘भारताला मीराबाईच्या कामगिरीचा अभिमान आहे. त्यासाठी तिचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा,’ असे मोदी यांनी टिष्ट्वट केले. ‘देशाला चॅम्पियन देणाºया मणिपूरचे आणि विश्व पराक्रमी मीराबाईचे अभिनंदन’, असे राष्टÑपतींनी म्हटले आहे.मीराबाईचे अभिनंदन करणाºयांमध्ये क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, पाच वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरीकोम, आॅलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदरसिंग यांचा समावेश आहे.भारतीय भारोत्तोलन महासंघाचे महासचिव सहदेव यादव म्हणाले,‘ही आॅलिम्पिकपेक्षा मोठी उपलब्धी आहे. विश्व स्पर्धेत अतिषय अवघड आव्हान असते. त्यासाठी मीराबाई आणि कोच विजय शर्मा अभिनंदनास पात्र आहेत.आज मी जे काही मिळवले आहे, ते प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य झाले नसते. मी आणि माझ्या प्रशिक्षकांनी उच्च स्तरावर यशस्वी होण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नव्हती. रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील अपयश माझ्यासाठी खूप निराशाजनक होते. मी रिओला चुका केल्या होत्या आणि अजूनही ती गोष्ट सलत आहे. मात्र, या पदकाने ती निराशा दूर झाली आहे. आता मी माझ्या कमजोर बाजूंकडे अधिक लक्ष देईल आणि आगामी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा तसेच टोकिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकाण्याचा पुर्ण प्रयत्न करेल.- मीराबाई चानू

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत