शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देशांतर्गत एकदिवसीय व टी-२० क्रिकेटमध्ये बदल

By admin | Updated: July 21, 2015 00:39 IST

नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)देखील २०१४-१५च्या सुरू वर्षात

नवी दिल्ली : नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)देखील २०१४-१५च्या सुरू वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही बदल केले आहेत. यंदा हे बदल एकदिवसीय व टी-२० क्रिकेटमध्ये महिला, पुरुष आणि ज्युनियर स्तरावर लागू होतील. हे बदल आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांकडे पाहून करण्यात आल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने आॅक्टोबर २०१५ ते मार्च २०१६ पर्यंतच्या सुमारे ९०० विविध सामन्यांत बदल केले आहेत. पुढील वर्षी भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या विश्वचषक टी-२० क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहेत. यानुसार विजय हजारे ट्रॉफी आणि टी-२० सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धांचा बदल करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सामावेश आहे. ५० वर्षे जुनी दुलीप ट्रॉफी ही स्पर्धा बंद करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यानुसार रणजी स्पर्धेप्रमाणे या दोन्ही स्पर्धा आता विभागीय पद्धतीऐवजी गटनिहाय पद्धतीने खेळविण्यात येतील. त्याचबरोबर देवधर ट्रॉफी स्पर्धेतदेखील बदल करण्यात आला असून, यामध्ये २०१४-१५च्या विजय हजारे ट्रॉफीतील दोन विजयी संघ व सिनियर राष्ट्रीय निवड समितीद्वारे निवडलेला संघ, अशा एकूण ३ संघांमध्ये ही स्पर्धा खेळविण्यात येईल. बीसीसीआयने दोन नवीन महिला स्पर्धा खेळविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांमध्ये आंतरराज्य आणि आंतरविभागीय स्तरावर २३ वर्षांखालील एकदिवसीय सामने खेळवले जातील. यानंतर सिनियर खेळाडूंमध्ये तीन दिवसीय सामने खेळविण्यात येतील. ज्युनियर खेळाडूंसाठी १९ वर्षांखालील चॅलेंजर ट्रॉफीदेखील खेळविण्यात येणार असून, त्यामध्ये तीन संघांचा समावेश असेल. जानेवारी महिन्यात बांगलादेश येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून राष्ट्रीय संघ निवडीसाठी ही स्पर्धा होईल. (वृत्तसंस्था)