शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
4
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
5
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
6
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
7
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
8
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
9
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
10
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
11
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
12
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
13
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
14
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
15
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
16
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
17
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
18
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
19
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

गतविजेत्यांना मुंबईचे आव्हान

By admin | Updated: April 8, 2015 15:48 IST

सुनील नारायण प्रकरण विसरुन कोलकाता नाईट रायडर्स आज, बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या

कोलकाता : सुनील नारायण प्रकरण विसरुन कोलकाता नाईट रायडर्स आज, बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नारायण याच्या गोलंदाजीबद्दल चॅम्पियन लीग टी- २० स्पर्धेत तक्रार करण्यात आली होती. विश्वचषक स्पर्धेतही तो खेळू शकला नव्हता. मात्र, ‘आयसीसी’ने त्याला रविवारी क्लिन चीट दिली.केकेआर संघाने इडन गार्डनच्या खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी सुनील नारायण सारखीच गोलंदाजी करणारा के. सी. करियप्पा याला दोन कोटी ४० लाख रुपये देऊन आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. बुधवारी येथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडूवर पकड ठेवणे कठीण होणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असून मुंबईकडे किरॉन पोलार्ड, कोरे अ‍ॅँडरसन व अ‍ॅरॉन फिंच सारखे धडाकेबाज फलंदाज आहेत. २०१३ मध्ये मुंबईने याच मैदानावर चेन्नई सुपरकिंग्जला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. मागील वर्षी मुंबईला सलग पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी आपला खेळ उंचावत अंतिम चार संघात जाग मिळवली खरी मात्र निर्णायक सामन्यात चेन्नई विरुध्द पराभव पत्करावा लागला होता. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या आवडत्या मैदानावर चांगली खेळी खेळू शकतो. या मैदानावर त्याने एकदिवसीय सामन्यात २६४ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. केकेआरच्या रॉबिन उत्थपाने ११ रणजी सामन्यांत ९१२ धावा केल्या आहेत. तो कर्णधार गौतम गंभीरसोबत डावाची सुरुवात करेल. मधल्या फळीत मनीष पांडे, सूर्यकुमार यादव व युसुफ पठाण यांच्यावर देखील संघाची जबाबदारी असेल. युसुफ सध्या फॉर्ममध्ये नसला तरी तो आपल्या खेळाच्या जोरावर कोणताही सामना फिरवू शकतो. गोलंदाजीची मदार मोर्नी मॉर्कल व उमेश यादव यांच्यावर असेल. बांगलादेशच्या शाकिब अल हसन याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. तसेच योहान बोथा, ब्रॅड हॉग व अझहर मेहमूद उपयुक्त खेळाडू आहेत. मुंबईच्या गोलंदाजीचा भार मलिंगा, विनयकुमार, हरभजन यांच्यावर असेल. (वृत्तसंस्था)