शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

पुण्याला पुनरागमनाचे आव्हान

By admin | Updated: May 9, 2016 23:00 IST

पहिल्या सत्रात पुणेकरांनी हैदराबादला नमवले होते, मात्र सध्याचा फॉर्म पाहता हैदराबाद संघ तुलनेत बलाढ्य दिसत असून पराभवाचा वचपा काढण्यास ते उत्सुक असतील

विशाखापट्टणम : यंदाच्या मोसमातून आयपीएल पदार्पण करणाऱ्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ निराशाजनक कामगिरीच्या गर्तेत सापडला असताना मंगळवारी त्यांच्यासमोर आव्हान असेल ते सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या सनरायझर्स हैदराबादचे. याआधी पहिल्या सत्रात पुणेकरांनी हैदराबादला नमवले होते, मात्र सध्याचा फॉर्म पाहता हैदराबाद संघ तुलनेत बलाढ्य दिसत असून पराभवाचा वचपा काढण्यास ते उत्सुक असतील.गुणतालिकेत पुणेकर सहाव्या स्थानी असून त्यांना १० सामन्यांतून केवळ ३ विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ अशीच स्थिती असेल. त्याचवेळी हैदराबादने मात्र अडखळत्या सुरुवातीनंतर जबरदस्त मुसंडी मारताना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. ९ सामन्यांतून ६ विजय मिळवताना हैदराबादने १२ गुणांची कमाई केली आहे. शिवाय गतसामन्यात त्यांनी गतविजेत्या बलाढ्य मुंबईचा सहजपणे धुव्वा उडवला असल्याने हैदराबादचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे.महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील पुण्याला स्पर्धेतील आव्हान टिकविण्यासाठी आता उरलेल्या प्रत्येक सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असेल. हैदराबाद, दिल्ली व मुंबईवरील विजय वगळता पुणेकर संपूर्ण स्पर्धेत झगडताना दिसले. शिवाय फाफ डू प्लेसिस, स्टीव्ह स्मिथ, केव्हिन पीटरसन आणि मिशेल मार्श हे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडले. याचाही मजबूत फटका पुण्याला बसला. त्याचवेळी उस्मान ख्वाजा व जॉर्ज बेली यांची संघात वर्णी लागली. मात्र त्यांना अजून आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. गोलंदाजांची बाजूही कमजोर असल्याने पुण्याला प्रतिस्पर्धी संघाला मर्यादित धावसंख्येत रोखण्यात अपयश येत आहे. त्यांचा कोणताही गोलंदाज सर्वाधिक बळी घेणाऱ्या अव्वल १५ गोलंदाजांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. फलंदाजीत केवळ अजिंक्य रहाणेने सातत्यपूर्ण कामगिरी करताना सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांत तिसरे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे मजबूत गोलंदाजी हैदराबादची ताकद आहे. अनुभवी व बलाढ्य गोलंदाजांच्या जोरावर हैदराबादपुढे प्रतिस्पर्धी संघ अडखळताना दिसतो. आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार, मुस्तफिजूर रहमान आणि बरिंदर सरन यांच्याविरुद्ध फलंदाज चाचपडताना दिसतात. त्याचवेळी फलंदाजीमध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन या धडाकेबाज सलामीवीरांसह युवराज सिंग, केन विल्यम्सन आणि अष्टपैलू मोझेस हेन्रिक्स यांच्यावर संघाची मदार असेल.(वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणाररायझिंग पुणे सुपरजायंट्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बाबा अपराजित, रविचंद्रन आश्विन, मुरुगन आश्विन, अंकुश बन्स, रजत भाटिया, स्कॉट बोलँड, दीपक चहार, अशोक दिंडा, पीटर हॅण्डकॉम्ब, जसकरण सिंग, अ‍ॅल्बी मॉर्केल, इश्वर पांडे, इरफान पठाण, थिसारा परेरा, इशांत शर्मा, आरपी सिंग, सौरभ तिवारी, अ‍ॅडम झम्पा, उस्मान ख्वाजा आणि जॉर्ज बेली.सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), आशिष रेड्डी, रिकी भुई, बिपुल शर्मा, टे्रंट बोल्ट, बेन कटिंग, शिखर धवन, मोझेस हेन्रिक्स, दीपक हुडा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथुन, इयान मॉर्गन, मुस्तफिजूर रहमान, आशिष नेहरा, नमन ओझा, विजय शंकर, कर्ण शर्मा, बरिंदर सरन, टी. सुमन, आदित्य तरे, केन विल्यम्सन आणि युवराज सिंग.