शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

‘नंबर वन’ कायम राखण्याचे आव्हान

By admin | Updated: August 18, 2016 01:40 IST

श्रीलंकेने मायदेशात झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बलाढ्य आॅस्टे्रलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिल्याचा फायदा भारतीय संघाला झाला.

पोर्ट आॅफ स्पेन : श्रीलंकेने मायदेशात झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बलाढ्य आॅस्टे्रलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिल्याचा फायदा भारतीय संघाला झाला. याजोरावर भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. मात्र, हेच स्थान आणखी भक्कम करण्यासाठी टीम इंडियाला गुरुवारपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुध्दच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागेल.विंडिजविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेत मालिका जिंकली आहे. मात्र, आता अखेरच्या सामन्यात बाजी मारुन आयसीसी क्रमवारीतील अग्रस्थान भक्कम करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी कर्णधार विराट कोहली यावेळी आपला तगडा संघ उतरवेल यात शंका नाही. या मालिकेत भारताने फलंदाजी व गोलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. फलंदाजीत रहाणेसह रविचंद्रन अश्विन सहाव्या स्थानी यशस्वी झाले. फलंदाजीवर नजर टाकल्यास रहाणे, कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल आणि अष्टपैलू रविचंद्रन अश्विन यांच्यावर भारताची मुख्य मदार असेल. त्याचवेळी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर मात्र विशेष दबाव असेल. अश्विनने दोन शतक झळकावून आपली चमक दाखवली. तर एका द्विशतकाच्या जोरावर कोहली मालिकेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनला आहे. तरी, गतसामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक झाली. तसेच शिखर धवनचे अपयश ही संघाची चिंतेची बाब आहे. त्यामुळेच जर भारताला आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखायचे असेल, तर आघाडीच्या फलंदाजांनी धावा काढणे आवश्यक आहे.भारताच्या गोलंदाजांनी देखील चमकदार कामगिरी केली आहे. विंडिजच्या कोरड्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंनी सातत्याने अचूक मारा करताना प्रतिकूल परिस्थितीतून भारताला सावरले. तर, गतसामन्यात भुवनेश्वर कुमारने मोक्याच्यावेळी अर्धा संघ बाद करत यजमानांचे कंबरडे मोडले. शिवाय इशांत शर्मा, अश्विन, जडेजा आणि मोहम्मद शामी देखील चांगल्या लयीत आहेत. (वृत्तसंस्था)भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, वृध्दिमान साहा, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, चेतेश्वर पुजारा आणि स्टुअर्ट बिन्नी.वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, देवेंद्र बिशू, जेरमेनी ब्लॅकवूड, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्रावो, रोस्टन चेस, शेन डॉर्विच, शॅनन गॅब्रीएल, लिआॅन जॉन्सन, मार्लेन सॅम्युअल्स, मिग्युएल कमिन्स, अलझारी जोसेफ आणि शाइ होप.