आॅईल आॅफ मॅन (इंग्लंड) : आॅईल आॅफ मॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत भारताच्या विश्वनाथन आनंदला रशियाच्या ब्लादिस्लाव आर्तेमिव्ह याने बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले.आनंदने सुरुवातीला काही आक्रमक चाली रचल्या मात्र आर्तेमिव्हवर तो दबाव आणू शकला नाही. त्याने प्यादांसह काही आक्रमक चाली रचण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र, आर्तेमिव्हसाठी या चाली नव्या नसल्याने त्याने सहजपणे आनंदला टक्कर दिली. आनंदच्या प्रत्येक चालीला आर्तेमिव्हकडून तोडिस तोड चाल मिळाल्याने अखेर ३२ चालीनंतर दोघांनीही डाव बरोबरीत सोडण्याचा निर्णय घेतला. आनंदला एकूण ५.५ गुणांवर समाधान मानावे लागले.दुसरीकडे, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या एस. पी. सेतुरमनने रशियाच्या सर्गेई कार्जाकिनला बरोबरीत रोखले. त्याचे ५.५ गुण झाले. अझरबैजानच्या आर्कादिज नादित्स्चने अमेरिकेच्या हिकारु नकामुराला नमवत ६.५ गुणांसह पोलंडच्या रादोस्लावा वोजतास्जेकसोबत बरोबरी साधली.
आॅइल आॅफ मॅन बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे आव्हान आले संपुष्टात; आनंदची लढत बरोबरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 04:09 IST