शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

विश्वविजयाचा आनंद साजरा करणार

By admin | Updated: February 20, 2016 02:42 IST

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी एखादी मालिका किंवा स्पर्धा जिंकला की यष्टी उखडतो व ती विजयाची स्मृती म्हणून जपतो. भारताच्या यजमानपदाखाली मार्चमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकही भारत जिंकेल

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी एखादी मालिका किंवा स्पर्धा जिंकला की यष्टी उखडतो व ती विजयाची स्मृती म्हणून जपतो. भारताच्या यजमानपदाखाली मार्चमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकही भारत जिंकेल अशी अपेक्षा व्यक्त करीत यावेळीही यष्टी उखडण्याचे भाग्य माझ्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना धोनी म्हणाला,‘ एखादी मालिका किंवा स्पर्धा जिंकल्यानंतर मी यष्टी हातात घेतो. यावेळी देखील यष्टी उखडण्याचा मान माझ्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा बाळगतो. माझ्याकडे स्टम्पस्चे भलेमोठे कलेक्शन झाले आहे. भविष्यातही या स्मृती कायम राहतील. मी कधीही कुठल्या स्टम्पवर दिनांक आणि स्थान लिहित नाही. पण १०-२० वर्षानंतर मॅचचे व्हिडिओ पाहणार तेव्हा कुठला स्टम्प कोणत्या सामन्याचा आहे हे समजू शकेल.’८ मार्चपासून सुरू होत असलेल्या विश्वचषकात आक्रमक खेळण्याचे वचन देत धोनी पुढे म्हणाला,‘ आक्रमकतेशी कुठलाही समझोता होणार नाही. आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकातही हेच धोरण असेल. विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला संघ संतुलित आहे. संघात कुणी जखमी झाला तरी त्याला कव्हर करण्यासाठी तितक्यात ताकदीचा खेळाडू सज्ज असेल असा आहे.’आॅस्ट्रेलियात टी-२० मालिका जिंकण्यासोबत आम्ही विश्वचषक जिंकण्याची कोनशिला ठेवल्याचे सांगून धोनी म्हणाला, ‘लंकेविरुद्ध विजयी वाटचाल सुरू राहिली. सहकाऱ्यांनी स्वत:ला जखमांपासून दूर ठेवल्यास सांघिक भावनेच्या बळावर विश्वचषक आमचाच असेल. अंतिम ११ खेळाडूंची निवड मात्र सामन्याचा दिवस आणि परिस्थितीवर विसंबून असेल असे त्याने स्पष्ट केले. विश्वचषकात भारताच्या गटात पाक संघ आहे. यावर धोनी म्हणाला, ‘पाक संघात काही नवे चेहरे दिसतील. त्यांची कामगिरी पहायला आवडेल.’ यंदा निवृत्ती नाहीच...निवृत्तीबाबत अप्रत्यक्षपणे विचारलेल्या प्रश्नावर धोनीने उलट सवाल करीत सांगितले की ‘यंदा तरी असे काही होणार नाही. आशिया कप आणि विश्व चषकापाठोपाठ आम्हाला आयपीएल खेळायचे आहे. नंतर वर्षभर कसोटी सामने आहेतच. यादरम्यान केवळ पाच वन डे सामने आहेत. माझ्या मते जे उत्तर हवे होते ते तुम्हाला मिळाले आहे.७ जुलै हा ‘एमएस’चा जन्मदिवस आहे. धोनी म्हणाला,‘फुटबॉल खेळायचो तेव्हा जर्सी नंबर २२ होता. भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले व केनियाला गेलो तेव्हा जर्सी नंबरच्या शोधात होतो. सात नंबर रिकामा होता. मी हाच क्रमांक निवडला. लोकांनी दुसऱ्या क्रमांकाची निवड करण्याचा सल्ला दिला पण मी सातवर कायम होतो. १९९९-२००० मध्ये मला क्रिकेटमध्ये ६२५ रुपये स्टायपन्ड मिळायचा. एक दिवस सरावास दांडी मारली तर २५ रुपये कपात व्हायची, या शब्दात माहीने सुरुवातीच्या दिवसांना आवर्जून उजाळा दिला.