शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

कॅरम : प्रशांत मोरे, अनिल चोरगे, आविष्कार मोहिते व सेजल लोखंडे यांची आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 20:43 IST

तिसऱ्या फेरीच्या सामन्यात चौथा मानांकित टाटा स्पोर्टस्‌ क्लबच्या आविष्कार मोहितेने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत शिवताराच्या उदय मांजरेकरची झुंज १९-२५, २५-२०, २५-१४ अशी मोडीत काढत आपले वर्चस्व सिद्ध करत चौथी फेरी गाठली.

मुंबई : बॉम्बे वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) तर्फे आयोजित सातव्या मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात चौथा मानांकित टाटा स्पोर्टस्‌ क्लबच्या आविष्कार मोहितेने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत शिवताराच्या उदय मांजरेकरची झुंज १९-२५, २५-२०, २५-१४ अशी मोडीत काढत आपले वर्चस्व सिद्ध करत चौथी फेरी गाठली.

दुसऱ्या एका तीन गेम रंगलेल्या सामन्यात विजय कॅरम क्लबच्या संजय कांबळेने डी. के. सी. सी. च्या ज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू सार्थक नागावकरची २५-४, ११-२५, २५-११ असा कडवा प्रतिकार मोडीत काढला. आर्युविमा महामंडळाच्या अनिल चोरगेने संघर्षपूर्ण तीन गेम रंगलेल्या लढतीत ९-२५, २५-१८, २५-१८ असा सचिवालय जिमखान्याच्या संजय वारंगवर विजय मिळवित स्पर्धेतला तिसरा ब्रेक टू फिनिश करण्याचा मान मिळविला. ही स्पर्धा मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या विद्यामाने वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) हॉल, उमरभाई पथ, आग्रीपाडा येथे वाय. एम. सी. ए. चे कार्याध्यक्ष श्री. शरद कांगा, प्रोग्रॅम कमिटी चेअरमन पीटर सेबॅस्टीयन, सरचिटणीस श्री. पॉल जॉर्ज व प्रोक्टर ब्रँच वाय. एम. सी. ए. चे चिटणीस श्री. भास्कर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नीट आणि नेटक्या पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सहकार्य लाभले आहे.

राष्ट्रीय विश्व विजेता रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने सरळ दोन गेममध्ये वालपखाडी क्लबच्या हिंमत राठोडचा २५-१८, २५-९ असा फाडशा पाडत विजयी कूच केली. ए. के. फाऊंडेशनच्या अमन जैनने तीन गेम रंगलेल्या लढतीत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दत्ता विनेरकरवर २५-१, ११-२५, २५-० असा विजय मिळवित चौथी फेरी गाठली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दिलीप सोसाने बोरिचा स्पोर्टस्‌ क्लबच्या भूषण पाटीलचा २५-१७, २५-० असा फाडशा पाडीत कूच केली. शिवताराच्या विवेक भारतीने दोन गेम रंगलेल्या लढतीत ए. के. फाऊंडेशनच्या रुपेश जाधववर २५-५, २५-६ असा सहज विजय नोंदवित कूच केली.  दुसऱ्या एका सामन्यात माजी राज्य विजेता दिलेश खेडेकरने टाटा स्पोर्टस्‌ क्लबच्या ललित वरळीकरचा २५-२, २५-२ असा फाडशा पाडत विजयी आगेकूच केली.

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सबज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू सेजल लोखंडेने अत्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अनुभवी वैभवी शेवाळेचा २५-१२, २५-११ असा सरळ दोन गेममध्ये पराभव करताना पहिल्या गेममध्ये ब्रेक टू फिनिश करण्याचा मान मिळविला. दुसऱ्या एका सामन्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या रोझिना गोडॅडने एस. एस. ग्रुपच्या मानसी शिंदेचा तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत २५-१६, ९-२५, २५-४ अशी कडवी झुंज मोडीत काढून आगेकूच केली.

या स्पर्धेत आतापर्यंत ४ ब्रेक टू फिनिश आणि ३ ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई