नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू रविचंद्रन आश्विन हे नुकत्याच झालेल्या विंडिजविरुध्दच्या कसोटी मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीत सर्वश्रेष्ठ ठरले. भारताने या मालिकेत २ -० असा विजय मिळवला. मात्र रॅकिंगमधील अव्वल स्थान गमावले आहे.शानदार फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहली याने ६२.७५ च्या सरासरीने सर्वाधिक २५१ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे याने १२१.५० च्या सरासरीने २४३ धावा केल्या. फलंदाजीच्या क्रमात तो दुसऱ्या स्थानी राहिला. लोकेश राहूल याने २३६ धावा करत तिसरे तर अश्विनने २३५ धावा करत चौथे स्थान पटकावले. वृद्धिमान साहा याने २०५ धावा करत पाचवे स्थान मिळवले. वेस्ट इंडिज्च्या क्रेग ब्रेथवेट याने आपल्या संघाकडून सर्वाधिक २०० धावा केल्या. गोलंदाजी अश्विन याने २३.१७ च्या सरासरीने सर्वाधिक १७ बळी घेतले. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याने ११, वेस्ट इंडिज्च्या मिगेल कमिन्स याने ९ आणि इशांत शर्मा याने ८ आणि रोस्टन चेस याने ८ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)> पाच अव्वल फलंदाजविराट कोहली (२५१ धावा), अजिंक्य रहाणे (२४३), लोकेश राहूल (२३६), रविचंद्रन अश्विन (२३५), वृद्धिमान साहा (२०५).पाच अव्वल गोलंदाजरविचंद्रन अश्विन (१७ गडी), मोहम्मद शमी (११), मिगेल कमिन्स (९), इशांत शर्मा (८), रोस्टन चेस (८).
कर्णधार कोहली, रविचंद्रन सर्वश्रेष्ठ!
By admin | Updated: August 24, 2016 04:23 IST