शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

कॅप्टन्स इनिंग्ज

By admin | Updated: April 14, 2016 02:57 IST

घरच्या मैदानावर स्पर्धेतील सलामीचा सामना खेळताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सला रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध माफक धावसंख्या गाठता आली होती; मात्र आपल्या दुसऱ्या

केकेआरवर बरसला रो‘हिट’ : मुंबई इंडियन्सचा पहिला विजय कोलकाता : घरच्या मैदानावर स्पर्धेतील सलामीचा सामना खेळताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सला रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध माफक धावसंख्या गाठता आली होती; मात्र आपल्या दुसऱ्या लढतीत या सर्व चुका टाळताना मुंबईकरांनी बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सला (केकेआर) त्यांच्याच भूमीवर ६ विकेटने लोळवले. या शानदार विजयासह जबरदस्त पुनरागमन केलेल्या मुंबईच्या विजयात रोहित शर्माची कॅप्टन्स इनिंग्ज निर्णायक ठरलीनाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या मुंबईसमोर केकेआरने निर्धारित षटकांत ५ बाद १८७ अशी आव्हानात्मक मजल गाठली. या वेळी पुन्हा एकदा मुंबईकर सामना गमावणार असेच चित्र होते; मात्र ईडन गार्डन लकी स्टेडियम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करताना मुंबईकरांनी धमाकेदार विजय मिळविला. रोहित आणि पार्थिव पटेल यांनी अर्धशतकी सलामी दिल्यानंतर, हार्दिक पंड्या आणि मिशेल मॅक्लनघन झटपट परतले; मात्र यानंतर रोहितने जोस बटलरसह चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. रोहितने ५४ चेंडंूत नाबाद ८४ धावांची विजयी खेळी करताना १० चौकार व २ षटकार ठोकले, तर त्याला उपयुक्त साथ देताना बटलरने २२ चेंडूंत ४१ धावांची तुफानी खेळी करताना ३ चौकार व ३ षटकार मारले. १९व्या षटकात आंद्रे रसेलने बटलरला बाद करून सामना चुरशीचा केला; मात्र रोहित आणि केरॉन पोलार्ड यांनी संघाला पहिला विजय मिळवून दिला.तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना कर्णधार गौतम गंभीर व मनीष पांड्ये यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १०० धावांच्या शानदार भागीदारीच्या जोरावर केकेआरने मुंबईसमोर २० षटकांत ४ बाद १८७ धावांची आव्हानात्मक मजल मारली. गंभीरने ५२ चेंडंूत ४ चौकार व एका षटकारासह ६४ धावांची खेळी करून सलग दुसरे अर्धशतक झळकावले, तर मनीषने केवळ २९ चेंडंूत ५२ धावांचा तडाखा देताना ३ चौकार व ३ षटकार खेचले. हरभजन सिंगने मनीषला बाद करून ही जोडी फोडली.मात्र, यानंतर आक्रमक अष्टपैलू आंद्रे रसेलने जबरदस्त हल्ला चढवताना १७ चेंडंूत १ चौकार व तब्बल ४ षटकार ठोकून ३६ धावा कुटल्या. या वेळी केकेआर दोनशेचा पल्ला गाठणार, असे दिसत होते. मात्र, अंतिमक्षणी मुंबईकरांनी नियंत्रित मारा करत केकेआरला काहीप्रमाणात रोखण्यात यश मिळवले. मॅक्लनघनने २ बळी घेत चांगला मारा केला, तर हार्दिक पंड्या व हरभजनने प्रत्येकी एक बळी घेतला. भूकंपामळे ईडनच्या प्रेसबॉक्समध्ये खळबळम्यानमार येथे झालेला भयंकर भूकंप आज येथे शहरातही जाणवला. कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स दरम्यान आयपीएल सामना कव्हर करण्यासाठी प्रेसबॉक्समधील उपस्थितीत पत्रकारांमध्येही त्यामुळे खळबळ माजली.खेळाडू आणि जवळपास ३0 हजार प्रेक्षक व प्रखर संगीतामुळे याची जाणीव झाली नाही; परंतु चौथ्या मजल्यावरील प्रेसबॉक्स चार सेकंद हादरत होता. हा प्रेसबॉक्स चार खांबांवर उभा आहे. यामुळे शहरात ३१ मार्चला फ्लायओव्हर ढासळल्याच्या आठवणी जाग्या झाल्या. अशा भूकंपामुळे प्रेसबॉक्समधील उपस्थित जवळपास ५0 पत्रकार बाहेर निघण्याचा मार्ग शोधत होते; कारण पूर्ण इमारतच हादरली होती. या दरम्यान मैदानावर नाणेफेक होत होती आणि याची माहिती गौतम गंभीर व रोहित शर्माला नव्हती.संक्षिप्त धावफलककोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ५ बाद १८७ धावा (गौतम गंभीर ६४, मनीष पांड्ये ५२, आंद्रे रसेल ३६; मिशेल मॅक्लनघन २/२५) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १९.१ षटकांत ४ बाद १८८ धावा (रोहित शर्मा नाबाद ८४, जोस बटलर ४१; पीयूष चावला १/२९, कुलदीप यादव १/३७)