शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिकआधी 90 मीटर अंतर गाठू शकतो; नीरज चोप्राने व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 05:30 IST

गोल्डन बॉय नीरज चोप्राने व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली : सध्या माझी तयारी खूप चांगल्याप्रकारे सुरू आहे आणि या जोरावर आगामी पॅरिस ऑलिम्पिकच्या आधी कधीही मी ९० मीटर दूर भाला फेकू शकतो, असा विश्वास भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने व्यक्त केला. नीरजने ८९.९४ मीटरचा आपला वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो २०२२ साली स्टॉकहोम डायमंड लीगदरम्यान केला होता.

नीरजने सराव सत्रामध्ये ९० मीटर अंतर गाठले आहे. मात्र, कोणत्याही स्पर्धेत त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपले सुवर्णपदक कायम राखण्याचा निर्धार केलेल्या नीरजने म्हटले की, ‘मी पॅरिस ऑलिम्पिकआधी ९० मीटर दूर भाला फेकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आशा आहे की, पॅरिस ऑलिम्पिकआधी ही कामगिरी करण्यात यश येईल. सध्या सर्वकाही सुरळीत सुरू आहे. त्यामुळे चाहत्यांना यासाठी पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. तयारी खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे.’

नीरजने आपल्या तयारीबाबत सांगितले की, ‘सत्राच्या सुरुवातीला माझे लक्ष तंदुरुस्ती आणि मजबूत गोष्टींवर होते. यामध्ये मी भालाफेकीसाठी विशेष सराव केलेला नाही. माझ्या मते, याबाबत माझ्या तंत्रामध्ये बरीच सुधारणा झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील यशाने आत्मविश्वास उंचावला असून, याचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खूप फायदा होईल. ही माझी दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा ठरणार असून, मी मानसिक आणि शारीरिकरीत्या सज्ज आहे.’

जागतिक महासंघाचा निर्णय कौतुकास्पद!जागतिक ॲथलेटिक्स महासंघाने आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या सर्व खेळाडूंना ५० हजार डॉलर पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. महासंघाच्या या निर्णयाचे नीरजने कौतुक करत आभार मानले. त्याने सांगितले की, ‘फुटबॉल किंवा इतर खेळांच्या तुलनेत ॲथलेटिक्समध्ये आर्थिक फायदा खूप कमी आहे. त्यामुळे जागतिक ॲथलेटिक्स महासंघाने सुवर्ण विजेत्या खेळाडूंना आर्थिक पुरस्कार देण्याचा घेतलेला निर्णय खूप चांगला आणि कौतुकास्पद आहे. जागतिक ॲथलेटिक्स खूप सक्रिय होत आहे. माझ्या मते, भविष्यात डायमंड लीगसारख्या स्पर्धांमध्येही खेळाडूंना आर्थिक पारितोषिक मिळेल. असे झाल्यास खेळाडूंसाठी हे खूप चांगले होईल.’

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021