थेट रियो येथून ...शिवाजी गोरे,रिओ दि जनरिओ, दि. 7- सायकलिंग स्टेडियमजवळ मॉकड्रिल सुरू आहे, असे सांगणाऱ्या सैन्य अधिकाऱ्यांचे धाबे इक्वेस्टेरियन क्रीडा प्रकाराच्या पत्रकार कक्षेत बंदुकीची गोळी घुुसल्याने दणाणले आहेत. हा प्रकार झाल्यानंतर राष्ट्रमंत्री रौल जंगमॅन यांच्यासह सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी, आयोजन समितीचे अधिकारीसुद्धा घटनास्थळी पोहोचले आहेत. ज्या भागात इक्वेस्टेरियन क्रीडा प्रकाराचे आयोजन केले आहे, तेथेच शेजारी सैन दलाची छावणी आहे. दुपारी १च्या सुमारास स्पर्धा संपल्यानंतर जेव्हा पत्रकारमधल्या विश्रांतीच्या वेळेत जेवणासाठी पत्रकार कक्षात आले होते. तेव्हा एक बंदुकीची गोळी दरवाजातून आत येऊन पत्रकार कक्षाच्या छतात घुसली. ती गोळी न्यूझीलंडच्या एक महिला पत्रकाराच्या अगदी जवळून गेली. त्यामुळे तेथे सर्वांचेच धाबे दणाणले आणि गोंधळ सुरू झाला. तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण पत्रकार कक्ष मोकळा करण्यात आला असून, चौकशी व तपास सुरू झाला आहे. न्युझीलंड संघातील खेळाडूंना टार्गेट तर केले जात नाही ना याचासुद्धा तपास आम्ही करत असल्याचे रक्षा मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. न्युझीलंड संघाचे खेळाडू, पत्रकार, अधिकारी यांना तेथील दुसऱ्या खोलीत हलविण्यात आले आहे.
पत्रकार कक्षेत थेट बंदुकीची गोळीच, सैन्य अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे
By admin | Updated: August 7, 2016 19:47 IST