शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बल्गेरियन ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या तानिशाची सुवर्णझेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 19:55 IST

या स्पर्धेत तिने दुहेरी गटात खेळताना उत्तराखंडच्या आदिती भट्ट हिच्यासह खेळताना ही कामगिरी केली.

पणजी : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोव्याच्या तानिशा क्रास्तो हिने बल्गेरियन ज्युनियर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. या स्पर्धेत तिने दुहेरी गटात खेळताना उत्तराखंडच्या आदिती भट्ट हिच्यासह खेळताना ही कामगिरी केली. उल्लेखनीय म्हणजे, तानिशाचे हे सलग तिसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक ठरले. तिने ज्या-ज्या स्पर्धेत भाग घेतला त्या-त्या स्पर्धेत सुवर्णमय झेप घेतली आहे. स्पर्धेत भारतीय संघाने सहा पदके पटकाविली. यामध्ये ३ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेत तानिशा-आदिती ही जोडी मुलींच्या दुहेरी गटात खेळली. या दोघींत पुन्हा एकदा उत्कृष्ट ताळमेळ दिसून आला. या जोडीने अंतिम सामन्यात तुर्कीच्या अव्वल मानांकित जोडीचा म्हणजे बेंगिसू इर्सेटिन-झेहरा इर्डाेफ या जोडीचा २१-१५, १८-२१, २१-१८ ने पराभव केला. महिला एकेरी गटात भारताच्या सौम्या इमाद फारुकी हिने दुसऱ्या मानांकित रशियाच्या एनास्तिसिया शापोवालोवा हिचा ९-२१, २१-१२, २२-१० ने पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले. मिश्र दुहेरीत एडविन ज्योय आणि श्रुती मिश्रा या जोडीने कमाल केली. त्यांनी दुसºया मानांकित ब्रिटीश जोडीचा २१-१४, २१-१७ ने पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले. मुलांच्या दुहेरी गटात, ईशान भटनागर आणि विष्णुवर्धन यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मालविका बन्सोड ही दुसºया मानांकित रशियाच्या अनास्तासिया हिच्याकडून पराभूत झाली. तिला कांस्यपदक प्राप्त झाले. "तानिशा ज्या पद्धतीने खेळात उंची गाठत आहे ते पाहून खूप आनंद होतोय. निश्चितच, तिच्या कामगिरीचा गोव्याला अभिमान असेल. कमी वेळेत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. मला तिचा अभिमान वाटतो," असे  तानिशाचे वडील क्लिफोर्ड क्रास्तो यांनी सांगितले.

टॅग्स :BadmintonBadmintongoaगोवा