शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

कांस्यपदकामुळे ‘मिशन रियो’ला बळकटी

By admin | Updated: December 8, 2015 02:20 IST

एफआयएच स्पर्धेत ३३ वर्षांनंतर पदक जिंकलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमॅन्स यांनी म्हटले आहे की, हॉलंडवरील विजयामुळे मिळालेल्या कांस्यपदकामुळे संघाचा आत्मविश्वास वाढणार असून

रायपूर : एफआयएच स्पर्धेत ३३ वर्षांनंतर पदक जिंकलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमॅन्स यांनी म्हटले आहे की, हॉलंडवरील विजयामुळे मिळालेल्या कांस्यपदकामुळे संघाचा आत्मविश्वास वाढणार असून, रियो आॅलिम्पिकच्या तयारीसाठी यातून मदत मिळणार आहे.भारतीय हॉकी संघाने काल हॉलंडला हरवून कांस्यपदक जिंकले होते. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला ३३ वर्षांनंतर हे पदक मिळाले आहे. रविवारच्या सामन्यात दोन गोलनी पिछाडीवर पडल्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या हॉलंडला शूटआउटमध्ये हरवून भारताने कांस्यपदक जिंकले होते. ओल्टमॅन्स म्हणाले, आम्ही चांगले खेळलो तर कोणत्याही संघाला हरवू शकतो, असे या पदकाने दाखवून दिले आहे. साखळी फेरीत आमची कामगिरी चांगली झाली नव्हती, त्यामुळे हा विजय महत्त्वाचा ठरतो. ओल्टमॅन्स यांनी भारताचा कर्णधार सरदार सिंह आणि गोलरक्षक पी. आर. श्रीजेश यांचीही स्तुती केली. ते म्हणाले, श्रीजेश आणि सरदारने महत्त्वाचे योगदान दिले. इतर खेळाडूंनीही त्यांना चांगली साथ दिली. आमची कामगिरी सुधारली, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. (वृत्तसंस्था)आम्ही ३३ वर्षांनंतर पदक जिंकले आहे. निश्चितच ही मोठी कामगिरी आहे. आम्ही अनेक लहानसहान गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले होते. या विजयातून सकारात्मक प्रेरणा घेऊन आम्ही रियो आॅलिम्पिकपर्यंत घेऊन जाऊ.- सरदारसिंह, कर्णधार भारतआमच्यासाठी विजयाचे पर्व अनेक वर्षांनंतर आले आहे, त्यामुळे याचे सेलिब्रेशन नक्की करणार आहोत. गोल वाचवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती, कारण यातून संघाला ताकद मिळते. ज्यावेळी संघाचा गोल होतो त्यावेळी मलाही आनंद होतो. त्यामुळे हा विजय माझा एकट्याचा नसून संपूर्ण संघाचा आहे. - पी. आर. श्रीजेश, गोलरक्षक, भारत