डर्बन : हुकमी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त पुनरागमन केले. पहिल्या डावात ३०३ धावांवर डाव संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडने ब्रॉडच्या जोरावर आफ्रिकेची दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १३७ अशी अवस्था केली. इंग्लंडकडे अजून १६६ धावांची आघाडी आहे. ब्रॉडने इंग्लंडसाठी निर्णायक कामगिरी करताना सलामीवीर स्टीआन वॉन झिल, कर्णधार हाशिम आमला आणि सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या धोकादायक एबी डिव्हिलियर्सच यांचा अडसर दूर केला. तीन खंदे फलंदाज बाद करून ब्रॉडने आफ्रिकेला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने १० षटकांत केवळ १६ धावांच्या मोबदल्यात आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. दुसरा दिवस संपला तेव्हा एल्गर ६७, तर बवुमा १० धावांवर खेळत आहेत. (वृत्तसंस्था)
ब्रॉडच्या जोरावर इंग्लंडचे पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:27 IST