मारलो (इंग्लंड) : येथे सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेत भारताला ब्रिटनकडून सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना त्यांनी २-१ ने गमावला. त्यामुळे मालिकेत भारतीय महिला संघ यजमानांकडून ०-२ ने पिछाडीवर आहे. पहिल्या क्वॉर्टरमध्ये पाहुण्या संघाने वर्चस्व राखले. त्यानंतर मात्र यजमानांनी दबाव निर्माण केला. त्यांनी १५ व्या मिनिटाला गोल नोंदवला. लेघने ब्रिटनसाठी हा गोल नोंदवला. दुसऱ्या क्वॉर्टरच्या सुरुवातीला ब्रिटनला पेनल्टी कॉनर मिळाला होता. याचा फायदा उठवत कलेनने गोल नोंदवला आणि ब्रिटनला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात त्यांची ही आघाडी कायम होती. भारताने तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये ३२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. मात्र, ब्रिटनच्या रक्षापंक्तीने तो अयशस्वी ठरविला. भारतीय संघ एक गोल नोंदवण्यात यशस्वी ठरला. हा गोल ग्रेसने नोंदवला. चौथ्या क्वॉर्टरमध्ये मात्र गोल झाला नाही. त्यामुळे ब्रिटनने २-१ बाजी मारली.
महिला हॉकी संघाचा ब्रिटनकडून पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 01:41 IST