शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : बजरंग पुनिया, रवी कुमार दहीया 2020च्या ऑलिम्पिकसाठी पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 16:15 IST

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारी भारतीय कुस्तीपटूंनी धमाकेदार कामगिरी केली.

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारी भारतीय कुस्तीपटूंनी धमाकेदार कामगिरी केली. नुकताच राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या बजरंग पुनियानं 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताच्याच रवी कुमार दहीयानेही 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या कामगिरीसह दोघांनी 2020 मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली. बुधवारी विनेश फोगाटने भारताकडून ऑलिम्पिक तिकीट मिळवण्याचा पहिला मान पटकावला होता. रवी कुमारने उपांत्यपूर्व फेरीत माजी जागतिक विजेत्या युकी ताकाहाशीचा 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 23 वर्षांखालील जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या रवी कुमारला उपांत्य फेरीत गतविजेत्या झौर युगूएव्हचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे बजरंगने 65 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तर कोरियाच्या जाँग सोलचा 8-1 असा पराभव केला.  बजरंगला 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019मध्ये पद्म श्री  व राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यानं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदकं आहेत. त्यानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर गतवर्षी सुवर्णपदक पटकावले.  

दरम्यान, 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला रित्या हातानं माघारी परतावे लागले. 62 किलो वजनी गटात तिला राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्या एडेनियी ( नायजेरिया) हीने 10-7 असे पराभूत केले. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020