शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : प्रो कबड्डी लीगचा फॉरमॅट बदलला; 20 जुलैला होणार सलामीचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 16:09 IST

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले.

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात 20 जुलैला सलामीचा सामना हैदराबाद येथे होणार आहे. पहिल्याच दिवशी सध्याच विजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स यांच्यात दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. लीगचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. 

मागील हंगामात सर्वांचे लक्ष वेधणारा मराठमोळा सिद्धार्थ देसाई यंदा तेलुगू टायटन्सकडून खेळणार आहे आणि सलामीलाच सिद्धार्थ विरुद्ध यू मुंबा असा सामना पाहायला मिळेल. राहुल चौधरी हा तमीळ थलायव्हाज संघात अजय ठाकूरसोबत खेळणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कॅप्टन कुल अनुप कुमार आणि राकेश कुमार यंदा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसतील. हे अनुक्रमे पुणेरी पलटन व हरयाणा स्टीलर्स यांचा सामना करतील.

यंदाची लीग ही साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. प्रत्येक शहरात शनिवारी लीग लढतींना सुरुवात होईल, तर मंगळवार हा विश्रांतीचा दिवस असणार आहे. घरच्या मैदानावर खेळण्यापूर्वी संघाला चार दिवसांची विश्रांती मिळणार आहे. 

हैदराबाद टप्पा - 20 ते 26 जुलैमुंबई टप्पा -  27 जुलै ते 2 ऑगस्टपाटणा टप्पा - 3 ते 9 ऑगस्ट

अहमदाबाद टप्पा - 10 ते 16 ऑगस्टचेन्नई टप्पा - 17 ते 23 ऑगस्टदिल्ली टप्पा - 24 ते 30 ऑगस्ट

बंगळुरू टप्पा - 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरकोलकाता टप्पा - 7 ते 13 सप्टेंबरपुणे टप्पा - 14 ते 20 सप्टेंबर

जयपूर टप्पा - 21 ते 27 सप्टेंबरपंचकुला टप्पा - 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरग्रेटर नोएडा टप्पा - 5 ते 11 ऑक्टोबर

एलिमिनेटर 1 व 2 - 14 ऑक्टोबर उपांत्य फेरी - 16 ऑक्टोबरअंतिम सामना - 19 ऑक्टोबर

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डीPKL 2018प्रो कबड्डी लीग