शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Breaking news : राही सरनोबतने विश्वचषकात फडकवला तिरंगा, सुवर्णपदकाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 21:10 IST

नेमबाजी विश्वचषकात 25 मी. पिस्तुल प्रकारात राहीने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

मुंबई : जर्मनी येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात राहीने सुवर्ण पटकावत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. नेमबाजी विश्वचषकात 25 मी. पिस्तुल प्रकारात राहीने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या सुवर्णपदकासह राहीने टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठीची पात्रताही पूर्ण केली आहे.

विश्वविक्रम नोंदवत सौरभने जिंकले सुवर्णपदकभारताचा युवा नेमबाज सौरभ तिवारी याने अपेक्षेनुरूप धडाकेबाज कामगिरी करताना जर्मनीच्या म्युनिच येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकाच्या पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्ण पटकावले. विशेष म्हणजे यावेळी सौरभने नवीन विश्वविक्रम नोंदवण्याचा पराक्रम केल्याने त्याच्या सुवर्ण पदकाला आणखी झळाळी आली.मेरठच्या १७ वर्षीय चौधरीने अंतिम फेरीमध्ये २४६.३ गुण नोंदवले. अशा प्रकारे त्याने फेब्रुवारीत नवी दिल्ली येथे विश्वचषकातील स्वत: केलेला २४५ गुणांचा विक्रम मोडीत काढला. चौधरीने याआधीच टोकियो आॅलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केलेला आहे. दहा मीटर एअर पिस्टलमध्ये रशियाच्या आर्तम चेरसुनोवने रौप्य आणि चीनच्या वेई पेंगने कांस्यपदक जिंकले.चौधरीने अंतिम फेरीमध्ये पहिल्या शॉटमध्ये ९.३ गुण मिळवले होते; परंतु त्यानंतर सलग पाच शॉटमध्ये १०.१ गुणांची नोंद केली. पहिल्या फेरीच्या शॉट्सनंतर तो चेरसुनोव्हाच्या तुलनेत ०.६ गुणांनी पिछाडीवर होता. दुसºया फेरीत सहा शॉटमध्ये मात्र त्याने आघाडी मिळवली. त्यात त्याने तीन शॉटमध्ये १० पेक्षा कमी गुण मिळवले; परंतु दोन शॉटमध्ये सलग १०.७ गुणांची कमाई केली. भारतीय नेमबाजाने त्यानंतर प्रत्येक एलिमिनेशनमध्ये आघाडी कायम ठेवली. त्याने अखेरीस १०.३ चे दोन शॉट, तर एक शॉट १०.७ चा लगावला. चौधरीचा अखेरचा शॉट १०.६ चा होता. त्यात तो स्वत:चा विक्रम मोडण्यात यशस्वी ठरला.भारताचा शहजार रिझवीदेखील या स्पर्धेत सहभागी होता. त्याने अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले खरे; परंतु अखेरीस १७७.६ गुणांसह तो पाचव्या स्थानावर राहिला. भारताचे म्युनिच विश्वचषकातील हे दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी रविवारी अपूर्वी चंदेला हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. 

राही सरनोबतची आॅलिम्पिक एन्ट्रीमहाराष्ट्राची शान असलेल्या स्टार नेमबाज राही सरनोबतने पुढील वर्षी होणाºया  टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवताना म्यूनिच विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.२५ मीटर पिस्तूलमध्ये सहज वर्चस राखताना राहीने बाजी मारली. अंतिम फेरीत आपला दबदबा राखताना राहीने एकूण ३७ निशाने साधले. याआधी २०१३ साली चांगवन विश्वचषक स्पर्धेतही राहीने सुवर्ण जिंकले होते.

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतShootingगोळीबार