शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

ब्राझील-क्रोएशिया सलामी

By admin | Updated: June 12, 2014 04:42 IST

फुटबॉलला धर्म आणि फुटबॉलपटूंना देव समजणाऱ्या ब्राझीलमध्ये वर्ल्डकपला गुरुवारपासून सुरुवात होत आहे.

साओ पाउलो (ब्राझील) : फुटबॉलला धर्म आणि फुटबॉलपटूंना देव समजणाऱ्या ब्राझीलमध्ये वर्ल्डकपला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. क्रोएशियाबरोबर होणाऱ्या सलामीच्या लढतीत या भक्तांना नाराज न करण्याचा अपेक्षांचा ‘पहाड’ यजमानांवर असणार आहे. या अपेक्षांना पुरुन उरणारी कामगिरी ब्राझील संघाला करावी लागणार आहेत. आकडेवारीवर नजर टाकली तर ब्राझीलचे पारडे सरस ठरते, म्हणूनच पहिल्या क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात ब्राझीलला विजेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. स्कोलारीपुढे दुखापतीसारख्या कोणत्याही समस्या नाहीत. त्यामुळे एखादा आश्चर्यजनक निर्णय सोडल्यास कॉन्फेडरेशन चषकात स्पेनला हरविणाऱ्या संघात ते फारसा बदल करतील, असे वाटत नाही. गेल्या विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीत ज्याच्या चुकीमुळे ब्राझीलला नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात पराभूत व्हावे लागले तो जुलियो सीजर यावेळीही गोलरक्षकाच्या भूमिकेत असणार आहे. तिएगो सिल्वा आणि डेव्हीड लुईज बचावफळीची जबाबदारी पेलतील. जादुई स्ट्रायकर नेयमार व हल सेंटर फॉरवर्ड फ्रेडसोबत समन्वयाचे काम करतील. दुसरीकडे क्रोएशियाला आपल्या अव्वल खेळाडूंची कमतरता जाणवेल. सेंटर बॅक सिमोनिचवर अगोदरच बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात विजयासाठी क्रोएशियाला अद्भुत खेळ करावा लागेल आणि तो चमत्कारच ठरेल. (वृत्तसंस्था)