शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Fifa Football World Cup: ब्राझीलचा बाद फेरीत प्रवेश, स्वित्झर्लंडला १-० ने नमवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 11:56 IST

भक्कम बचावाच्या स्वित्झर्लंडला १-० ने नमवले

दोहा : स्टार खेळाडू नेमारच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या ब्राझीलने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना स्वित्झर्लंडला १-० असे नमवत यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. यासह ग गटात ६ गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावत ब्राझीलने बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. 

बचावपटूंचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात ब्राझीलच्या कॅसेमिरोने एकमेव आणि निर्णायक गोल केला. यंदाच्या विश्वचषकाची बाद फेरी गाठणारा ब्राझील दुसरा संघ ठरला. याआधी गतविजेत्या फ्रान्सने सलग दुसऱ्या विजयानंतर बाद फेरी गाठली होती. स्वित्झर्लंडला बाद फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी आता २ डिसेंबरला सर्बियाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल.  पहिल्या सत्रात दोन्ही संघांच्या बचावफळीने दमदार खेळ करत सामना गोलशून्य बरोबरीत राखला. दोन्ही संघाचा पवित्रा पाहून सामना गोलशून्य बरोबरीत राहणार असल्याचे दिसत होते. मात्र, ८३व्या मिनिटाला कॅसेमिरोने स्वित्झर्लंडच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत चेंडू थेट गोलजाळ्यात धाडला. त्याआधी, विनिशियस ज्युनिअर याने ६६व्या मिनिटाला अप्रतिम गोल केला होता. परंतु, ‘वार’ प्रणालीत तो ऑफ साइड असल्याचे स्पष्ट झाल्याने हा गोल अवैध ठरला.

ब्राझील विश्वचषक स्पर्धेत सलग १७ साखळी सामन्यांमध्ये अपराजित राहिले.२००६ पासून स्वित्झर्लंडला एकदाही विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीतील सुरुवातीचे सलग दोन सामने जिंकता आलेले नाही.आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत स्वित्झर्लंडला दक्षिण अमेरिकन देशांविरुद्धच्या नऊ सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकता आला आहे.२० वर्षीय फॅबियन रीडर हा जोहान जुरोनंतरचा (१९ वर्ष, २००६) विश्वचषक स्पर्धा खेळणारा दुसरा सर्वात युवा स्विस खेळाडू ठरला.

ब्राझीलने विश्वचषकातील आपल्या अखेरच्या दहापैकी नऊ गोल हे सामन्यातील दुसऱ्या सत्रातच नोंदवले आहेत. सामन्यात ब्राझीलने गोल करण्याच्या १३ संधी निर्माण करताना पाचवेळा गोलजाळ्याचा वेध घेतला. स्वित्झर्लंडने गोल करण्याच्या ६ संधी निर्माण केल्या; पण त्यांना एकदाही गोलजाळ्यावर आक्रमण करता आले नाही. 

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Brazilब्राझील