शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

गोलंदाजांचा धुमाकूळ

By admin | Updated: November 25, 2015 23:48 IST

फिरकीपटूंसाठी अनुकूल जामठाच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी १२ फलंदाजांना माघारी परतवत गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. भारताचा पहिला डाव ७८.२ षटकांत २१५ धावांत संपुष्टात आल्या

गुणवंत चौधरी, नागपूरफिरकीपटूंसाठी अनुकूल जामठाच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी १२ फलंदाजांना माघारी परतवत गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. भारताचा पहिला डाव ७८.२ षटकांत २१५ धावांत संपुष्टात आल्यानंतर प्रत्युत्तरात खेळणाऱ्या पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाची दिवसअखेर २ बाद ११ अशी अवस्था झाली आहे. बुधवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ७ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या डीन एल्गर याला कर्णधार अमला खाते न उघडता साथ देत होता. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर वान जिल (००) पुन्हा एकदा अश्विनचे लक्ष्य ठरला तर नाईट वॉचमन इम्रान ताहिर (४) याला जडेजाने तंबूचा मार्ग दाखवला. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर हा कसोटी सामनाही तीन दिवसांत संपण्याचे संकेत मिळत आहेत. फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवर ‘अश्विन अ‍ॅण्ड कंपनी’ला सामोरे जाण्याचे पाहुण्या संघापुढे आव्हान आहे. या कसोटी मालिकेत सलग तिसऱ्या सामन्यात पहिल्याच दिवशी पहिला डाव संपुष्टात आला आहे. भारतातर्फे एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिका संघाला भारताची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप २०४ धावांची गरज असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. फिरकीला अनुकूल जामठ्याची खेळपट्टी बघता उद्या, गुरुवारी दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना घाम फुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला मुरली विजय व शिखर धवन यांनी सलामीला अर्धशतकी भागीदारी करीत चांगली सुरुवात करून दिली. शिखर (१२) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. एल्गरने शिखरला माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर मुरली विजय (४०) मोर्कलचे लक्ष्य ठरल्यामुळे भारताची २ बाद ६९ अशी अवस्था झाली. उपाहाराला खेळ थांबला त्यावेळी भारताने २ बाद ८५ धावांची मजल मारली होती. उपाहारानंतरच्या सत्रात मोर्कलने वेगवान गोलंदाजीचा शानदार नमुना सादर केला. त्याआधी, सुरुवातीला हार्मरने चेतेश्वर पुजाराला (२१) तंबूचा मार्ग दाखवत भारताला तिसरा धक्का दिला. रहाणेने सुरुवातीलाच षटकार ठोकत आक्रमक फलंदाजीचे संकेत दिले, पण मोर्कलने राहणे (१३) व कर्णधार विराट कोहली (२२) यांना दोन षटकांच्या अंतरात माघारी परतवत भारताची ५ बाद ११६ अशी अवस्था केली. संधी मिळालेल्या रोहित शर्माला (२) विशेष चमक दाखवता आली नाही. रोहितला हार्मरने तंबूचा मार्ग दाखवला. उपाहार ते चहापानादरम्यान भारताने २८ षटकांत ६४ धावांच्या मोबदल्यात चार फलंदाज गमावले. उपाहारानंतरच्या खेळात रिव्हर्स स्विंगचा प्रभाव अनुभवाला मिळाला. साहा व जडेजा (३४ धावा, ६ चौकार) यांनी सातव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याच्या आशा निर्माण केल्या. रबादाविरुद्ध आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात जडेजाचा त्रिफळा उडाल्यामुळे ही भागीदारी संपुष्टात आली. साहा व अश्विन यांनी धावफलक हलता ठेवताना संघाला २००चा पल्ला ओलांडून दिला. हार्मरने संयमी फलंदाजी करणाऱ्या साहाला (३२) माघारी परतवत भारताची ८ बाद २०१ अशी अवस्था केली. अश्विन (१५) व मिश्रा (३) यांना अनुक्रमे ताहिर व हार्मर यांनी माघारी परतवत भारताचा डाव गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज हार्मरने ७८ धावांच्या मोबदल्याच ४ बळी घेतले. मोर्कल (३-३५), रबाडा (१-३०), एल्गर (१-७) व ताहिर (१-४१) यांनी त्याला योग्य साथ दिली. दरम्यान मोर्कलला स्नायूच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला आणखी एक धक्का बसला. त्याआधी, भारताने संघात दोन बदल करताना वरुण अ‍ॅरोन व स्टुअर्ट बिन्नी यांच्या स्थानी रोहित शर्मा व अमित मिश्रा यांना संधी दिली.भारत पहिला डाव : मुरली विजय पायचित गो. मोर्केल ४०, शिखर धवन झे. व गो. एल्गर १२, चेतेश्वर पुजारा पायचित गो. हार्मर २१, विराट कोहली झे. विलास गो. मोर्कल २२, अजिंक्य रहाणे त्रि. गो. मोर्कल १३, रोहित शर्मा झे. डिव्हिलियर्स गो. हार्मर ०२, वृद्धिमान साहा, झे. ड्युमिनी गो. हार्मन ३२, रवींद्र जडेजा त्रि. गो. रबादा ३४, रविचंद्रन अश्विन त्रि. गो. ताहिर १५, अमित मिश्रा पायचित गो. हार्मर ०३, ईशांत शर्मा नाबाद ००. अवांतर (२१). एकूण ७८.२ षटकात सर्वबाद २१५. बाद क्रम : १-५०, २-६९, ३-९४, ४-११५, ५-११६, ६-१२५, ७-१७३, ८-२०१, ९-२१५, १०-२१५. गोलंदाजी : मोर्कल १६.१-७-३५-३, रबादा १७-८-३०-१, हार्मर २७.२-२-७८-४, एल्गर ४-०-७-१, ताहिर १२.५-१-४१-१, ड्युमिनी १-०-६-०.दक्षिण आफ्रिका पहिला डाव : डीन एल्गर खेळत आहे ०७, स्टियान वान जिल झे. रहाणे गो. अश्विन ००, इम्रान ताहिर त्रि. गो. जडेजा ०४, हाशिम अमला खेळत आहे ००. एकूण ९ षटकांत २ बाद ११. बाद क्रम : १-४, २-९. गोलंदाजी : ईशांत २-१-४-०, अश्विन ४-२-५-१, जडेजा ३-१-२-१.

 

> गर्दीने लक्ष वेधले !कसोटी सामना म्हटला की प्रेक्षक सहसा मैदानाकडे भटकत नाहीत. पण जामठा मैदानावर बुधवारी दहा हजारावर प्रेक्षकांनी सामन्यासाठी गर्दी केली. कालपर्यंत १७५०० तिकिटे विकली गेल्याची माहिती व्हीसीए प्रशासनाने दिली. पहिल्या दिवसाचा खेळ पाहायला येणारी गर्दी बघितल्यानंतरत्याचा प्रयत्य आला. गुरुनानक जयंतीची शासकीय सुटी असल्याने आबालवृद्ध आणि शाळकरी विद्यार्थ्यांसह संपूर्ण कुटुंबाने सामन्याचा आनंद लुटला. याशिवाय मनपाच्या पन्नालाल देवडिया शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत अन्य शाळांमधील विद्यार्थीदेखील गणवेशात आले होते. भारताने सुरुवातीला फलंदाजी घेतल्याने टाळ्या आणि शिट्या वाजवून तसेच तिरंगा फडकवित अनेकांनी मनमुराद दाद दिली. > खेळाडूंच्या ‘सौ.’ पे्रस बॉक्समध्ये !स्थानिक खेळाडू आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या तिन्ही खेळाडूंच्या श्रीमतींनी आज प्रेस बॉक्समध्ये लंच घेतला. सर्वजणी दिवसभर सामन्याचा आनंद लुटण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. उमेशला सध्या अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळू शकले नाही.> मेक्सिकन वेव्ह !कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे फलंदाजी करीत असताना उपस्थित चाहत्यांनी मेक्सिकन वेव्ह सादर केली. प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहात असतानाच भारतीय खेळाडू एकापाठोपाठ एक बाद होत गेले. यामुळे मेक्सिकन वेव्ह देखील फार वेळ सादर झाली नाही. नागपुरात सामना असला की मेक्सिकन वेव्ह हमखास दिसते.फोटोसाठी चढाओढ !सामन्याच्या सुरक्षेत व्यस्त असलेले पोलीसही क्रिकेटप्रेमी आहेत. त्यांचेही आवडते खेळाडू आहेतच. अनेक जवानांनी ड्युटीदरम्यान संधी मिळेल तेव्हा आपल्या आवडत्या खेळाडूचे छायाचित्र स्वत:च्या मोबाईलमध्ये साठवून घेण्याची संधी सोडली नाही. उपाहारादरम्यान खेळाडूंच्या ड्रेसिंगरुमजवळ तैनात पुरुष आणि महिला जवानांना फोटो काढून घेण्याचा मोह आवरत नव्हता.> दिवसाचे तिकीट नाही !कसोटी सामन्यातील पाचही दिवसाचे तिकीट खरेदी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. अमूक एका दिवसाचे तिकटी हवे असेल तर ते मिळणार नाही. व्हीसीएने दिलेल्या माहितीनुसार सिझन तिकीट निर्धारित दरात ‘बुक माय शो’ वेबसाईटवर आॅनलाईनवर तसेच व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्स स्टेडिमयमध्ये उपलब्ध आहे. प्रेक्षकांना जामठा स्टेडियम परिसरात तिकीट उपलब्ध होऊ शकणार नाही.> खोडा, पाटील उपस्थितया सामन्यादरम्यान राष्ट्रीय निवड समिती प्रमुख संदीप पाटील आणि सदस्य गगन खोडा यांनी हजेरी लावली आहे. या सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीवरून कुठलीही संघ निवड होणार नसली तरी निवड समितीचे सदस्य येथे दाखल झाले आहेत. याशिवाय समालोचनासाठी आलेले माजी दिग्गज सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, अनिल कुंबळे, द. आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज ग्रॅमी पोलाक हे देखील आकर्षण ठरले.> बॅग, बाटल्या अडवल्या!प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देतेवेळी पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या बॅग्स, पाण्याच्या बाटल्या आणि भारतीय तिरंग्यासोबत असलेले पीव्हीसी पाईपचे दंडे आतमध्ये घेऊन जाण्यास मनाई केली. बॅग्स दारावर जमा करण्याची सक्ती करण्यात आली होती. सर्वाधिक फटका गुटखा प्रेमींना बसला. अनेकांकडे असलेल्या खर्ऱ्याच्या पुड्या आणि गुटखा दारावरच काढून घेण्यात आल्या.