शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

सराव सामन्यात गोलंदाजांची धुलाई, ऑस्ट्रेलिया सर्वबाद ३७१

By admin | Updated: February 8, 2015 13:27 IST

विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत ३७१ धावांचा डोंगर उभा केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

अॅडिलेड, दि. ८ - विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत  ३७१ धावांचा डोंगर उभा केला आहे. डेव्हीड वॉर्नरच्या १०४ धावा आणि ग्लेन मॅक्सवेलच्या तडाखेबाज १२२ धावांच्या खेळीच्या आधारे ऑस्ट्रेलियाने सर्व गडी गमावत ४८ षटकात ३७१ धावा केल्या. 

अॅडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज सराव सामना सुरु आहे. या सामन्याला अधिकृत सामन्याचा दर्जा नाही. मात्र तिरंगी मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर या सामन्यात चमकदार कामगिरी करुन संघाचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. ईशांत शर्मा दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला असून त्याच्या जागी मोहित शर्माची संघात निवड करण्यात आली होती. या सामन्यात सर्व फलंदाज व गोलंदाजांनी संधी मिळू शकते. यानुसार भारताने आठही प्रमुख गोलंदाजांनी संधी दिली. मात्र एकही गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रोखण्यात यशस्वी ठरला नाही. सलामीवीर डेव्हीड वॉर्नर आणि मधल्या फळीतील ग्लेन  मॅक्सवेल या दोघांनी भारतीय गोलंदाजाची यथेच्छ धुलाई केली. मॅक्सवेलने ५७ चेंडूंमध्ये ११ चौकार व ८ षटकारांच्या आधारे १२२ धावा केल्या. तर सलामीवीर डेव्हीड वॉर्नरने ८४ चेंडूत१०४ धावा केल्या. त्याला अक्षर पटेलने बाद केले. तर मॅक्सवेल हा रिटायर्ड झाला. 

ईशांत शर्माऐवजी संघात समावेश झालेला मोहित शर्मा हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ६ षटकात ६२ धावा दिल्या पण त्या मोबदल्यात शर्माने दोन विकेटही घेतल्या. मोहम्मद शमीने नऊ षटकात ८३ धावा देत तीन विकेट घेतल्या.  उमेश यादवने दोन तर स्टुअर्ट बिन्नी व अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन व रविंद्र जाडेजा या तिघांना एकही विकेट घेता आली नाही. आता ऑस्ट्रेलियाच्या ३७२ धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.