शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गोलंदाजांनी बिघडविले पंजाबचे संतुलन

By admin | Updated: May 9, 2017 00:30 IST

केकेआरविरुद्ध अनेकजण किंग्ज इलेव्हन पंजाबला विजयाचा दावेदार मानायला तयार नाहीत, याची दोन कारणे आहेत. एकतर गौतम गंभीरचे

रवी शास्त्री लिहितात...केकेआरविरुद्ध अनेकजण किंग्ज इलेव्हन पंजाबला विजयाचा दावेदार मानायला तयार नाहीत, याची दोन कारणे आहेत. एकतर गौतम गंभीरचे सहकारी ‘पॉवर प्ले’मध्ये जबर कामगिरी करतात. दुसरे कारण म्हणजे पंजाबच्या गोलंदाजांमधील सातत्याचा अभाव. दोन्ही संघ महिनाभरापूर्वी ईडन गार्डनमध्ये परस्परांविरुद्ध खेळले, त्या वेळी उभय संघांमध्ये दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या. तेव्हापासून दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेत फार काही बदल झालेले नाहीत.केकेआर संघ अद्यापही ‘पॉवर प्ले’मध्ये बलाढ्यच आहे. सुरुवातीला पंजाबची घसरगुंडीदेखील कायम आहे. सुनील नारायण सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करीत असून, ख्रिस लीन तर आजारातून उठलेला बालक आईस्क्रिमवर तुटून पडावा, तसा खेळात मुसंडी मारताना दिसत आहे. पंजाबसाठी संदीप शर्मा आणि अक्षर पटेल हे हुकमी एक्के ठरले. या दोघांची बहारदार कामगिरी सुरूच आहे. तरीही समस्या कायम आहे. हे दोन्ही गोलंदाज आपापल्या वाट्याचे केवळ चार-चार षटके टाकू शकतात. सुरुवातीच्या षटकांमध्ये दोघांचा वापर झाल्यास नंतरच्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाज मोठ्या प्रमाणावर धावा वसूल करतात. या दोन्ही गोलंदाजांपासून चेंडू दूर असेल तर प्रतिस्पर्धी फलंदाजांचे चांगलेच फावते, असे चित्र आहे. पंजाबचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारतात पण विजय मिळवून देण्यात गोलंदाज अपयशीच ठरत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये हशिम अमलाच्या नावावर दोन शतकांची नोंद झाली. तो शैलीदार आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम फलंदाज मानला जातो. अन्य फलंदाजही धावांचे योगदान देतच आहेत. पण पंजाबचा गोलंदाजी मारा विजयाची सर्व समीकरणे बिघडवून टाकतो.केकेआरविरुद्धची लढत मोलाची असेल. पंजाब अद्याप ‘प्ले आॅफ’मधून बाहेर झालेला नाही. दुसरीकडे केकेआरदेखील या सामन्यात गाफिल राहणार नाही. केकेआरने आघाडीच्या दोन संघांमध्ये स्थान न पटकविल्यास या संघाचे खेळाडू स्वत:ला दोष देतील यात शंका नाही. केकेआरचा पुढचा सामना बलाढ्य मुंबई इंडियन्सविरुद्ध असल्यामुळे त्याआधी पंजाबवर विजय मिळविणे हेच लक्ष्य केकेआरने आखले असावे. (टीसीएम)