अॅडिलेड : फिलिप ह्युजचा स्थानिक सामन्यात गेल्या मंगळवारी बाऊन्सर डोक्यावर आदळून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचा शोक कायम असताना पहिल्या कसोटीसाठी सज्ज होत असलेल्या आॅस्ट्रेलियन संघातील गोलंदाज शुक्रवारी सरावादरम्यान बाऊन्सरचा मुक्तपणे वापर करीत असल्याचे चित्र होते.ह्युजच्या मृत्यूनंतर सर्वच खेळाडू पहिल्यांदा मैदानात परतले होते. भारताविरुद्ध ९ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीसाठी तयारी म्हणून मिशेल जॉन्सन, पीटर सिडल आणि ज्योश हेजलवुड यांनी फारच आक्रमक मारा केला. त्यावर शेन वाटसन आणि ख्रिस रॉजर्स यांना सावध फलंदाजी करावी लागली. मिशेल मार्श याने तर आपला भाऊ शॉन मार्शवरच बाऊन्सरचा मारा केला. दोघेही पहिली कसोटी खेळले तर २००२ मध्ये स्टीव्ह आणि मार्क वॉ यांच्यानंतर आॅस्ट्रेलियासाठी खेळणारी ही दुसरी जोडी ठरेल.सरावादरम्यन बाऊन्सरचा मारा पाहिल्यानंतर पहिल्या कसोटीदरम्यान यजमान गोलंदाजांचे बाऊन्सर हेच प्रमुख शस्त्र असेल हे स्पष्ट झाले आहे. सरावाआधी कोच डेरेन लेहमन यांनी मात्र आम्ही यापूर्वीही असाच मारा केला असल्याचे म्हटले होते. रेयॉन हॅरिस याने अन्य तीन गोलंदाजांसोबत सराव केला नाही पण नंतर त्याने गोलंदाजी केली. सरावात खेळाडू रममान झालेत का, या प्रश्वानर लेहमन यांनी सावध उत्तर दिले. ह्युजच्या मृत्यूच्या धक्यातून सावरत नाही तोच कसोटी खेळायची असल्याने कशी कामगिरी होणार हे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले. अशी स्थिती आधी उद्भवली नसल्याने सामान सुरू होईस्तोववर सांगता येणार ानही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. (वृत्तसंस्था)
सरावात ‘बाऊन्सर’मारा चालूच
By admin | Updated: December 5, 2014 23:54 IST