शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयच्या मीडिया मॅनेजर अरोराला डच्चू

By admin | Updated: February 7, 2017 02:33 IST

भारतीय क्रिकेट संघाचे मीडिया मॅनेजर निशांत अरोरा हे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे खबरी म्हणून काम करीत असल्याचा संशय आल्यामुळे प्रशासकांच्या समितीने त्यांना डच्चू दिला आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मीडिया मॅनेजर निशांत अरोरा हे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे खबरी म्हणून काम करीत असल्याचा संशय आल्यामुळे प्रशासकांच्या समितीने त्यांना डच्चू दिला आहे. भारतीय क्रिकेट संघांच्या ड्रेसिंग रूममधील खेळाडूंमध्ये झालेल्या महत्त्वाच्या चर्चा अरोरा ठाकूर यांना सांगत असल्याचे दोन वरिष्ठ खेळाडूंनी सांगितले असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अरोरा यांच्या अशा चुगलीखोर वागण्यामुळे खेळाडूंमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप या खेळाडूंनीसुद्धा केला आहे. दरम्यान, अरोरा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की प्रशासकांच्या समितीने दिल्ली येथील कार्यालय मुंबईतील क्रिकेट हाऊसमध्ये स्थानांतरित करण्यात येत असल्याचे सांगितले. मला दिल्ली सोडायची नव्हती, त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. उर्वरित स्टाफ मुंबई येथेच काम करीत आहे. अरोरा हैदराबादलासुद्धा गेले नाहीत. दिल्ली कार्यालयातील सर्व कर्मचारी अनुराग ठाकूर यांच्या स्टाफचा भाग होता आणि सर्वोच्च न्यायालयातर्फे त्यांना हटविण्यात आल्यानंतर हा स्टाफ हटविण्यात येणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले होते. सीओएच्या सदस्य डायना एडलजी म्हणाल्या, की त्यांनी कुणाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही, केवळ कार्यालय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘‘आम्ही केवळ एवढेच म्हटले, की दिल्लीतील अध्यक्षांचे कार्यालय बंद करण्यात यावे आणि दिल्ली कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना जावे लागेल. आम्ही कधीच निशांतचे नाव घेतले नाही; पण त्यांची जर दिल्ली कार्यालयात नियुक्ती करण्यात आली असेल तर त्यांना जावे लागेल. परंतु, जर मीडिया मॅनेजरचा करार यामध्ये येत नसेल, तर राहुल जोहरी (बीसीसीआय सीईओ) याबाबत अंतिम निर्णय घेतील. निशांतच्या पर्यायावरही राहुल निर्णय घेतील.’’ अरोरा १८ महिन्यांपासून बीसीसीआयचे मीडिया मॅनेजर होते. (वृत्तसंस्था)